आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुम्ही न्यायालयापेक्षाही मोठे आहात'? कोर्टाने तुरुंग अधिकाऱ्यांना फटकारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना तुरुंगात वाचण्यासाठी पुस्तके देण्यात यावीत, असा आदेश देऊनही त्याचे पालन न केल्याप्रकरणी गुरुवारी न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना फटकारले. "तुम्ही न्यायालयापेक्षाही मोठे आहात का', अशा शब्दांत न्यायाधीशांनी पोलिसांना फटकारले. 


कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात तुरुंगात सुरेंद्र ढवळे, महेश राऊत, रोना विल्सन यांनीही जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी न्यायालयाकडे विलास सोनवणे, कॉ. गोविंद पानसरे, रावसाहेब कसबे यांची पुस्तके वाचण्यास मिळावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने परवानगी देऊनही त्यांना पुस्तके वाचण्यास देण्यात आली नाहीत म्हणून न्यायालयाने या वेळी पोलिसांना फटकारत आदेशाचे पालन करण्यास सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...