आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कबीर सिंह’मुळे केवळ वाद सुरू; 4 हजार चित्रपटांच्या अभ्यासात बॉलीवूड महिलांना दुय्यम स्थान देत असल्याचे झालेय निष्पन्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहिद-कियाराची भूमिका असलेल्या 'कबीर सिंह' या तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'च्या रिमेकवर वाद सुरू आहे. नारीवादी एका बिघडलेल्या-रागीट व्यक्तीला हीरो बनवण्यावर टीका करत आहेत, तर चित्रपटाच्या समर्थनार्थ बाेलणारेही खूप आहेत. 

 

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' चित्रपटाच्या कमाईपेक्षा त्याचे कथानक, त्यातील कंटेंटची चर्चा जास्त आहे. कबीर सिंह सारखी भूमिका पडद्यावर दाखवली पाहिजे का यावरून समिक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत विभिन्न मते आहेत. वास्तविक कबीर सिंह हे एक जिद्दी, महिलांचा अपमान, जबरदस्ती करणारे नशेबाज पात्र आहे. अशा पत्राला नायकासारखे सादर करून त्याचे काैतुक करण्याचा समाजावर वाईट परिणाम हाेऊ शकताे अशी नारीवादींना चिंता वाटत आहे.'अर्जुन रेड्डी' या तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या चित्रपटावरील परिक्षणाला यूट्‌यूब वर लाखो व्हयुज मिळत आहेत. चित्रपट समिक्षक सुचारिता त्यागी यांचा 'नॉट अ मुव्ही रिव्हयू' ११ लाख वेळा बघितला गेला आहे. त्या म्हणतात, असा चित्रपट दाेन वेळा बनवण्याची गरज हाेती का. एखाद्या पुरुषाचे एखाद्या महिलेसाठीअतिउदात्तीकरण असलेली प्रेम कहाणी दाखवणे चुकीचे नाही. परंतु अशा व्यक्तीला हिराे म्हणून दाखवणे कितपत याेग्य आहे. अशा पात्रासाठी शिट्या वाजवतात, टाळ्या पिटतात हे बघून अस्वस्थ वाटते. तुम्ही अशा राक्षसाला बिचारा बनवून पडद्यावर दाखवत आहात ज्याचे हृदय तुटलेेले आहे. या चित्रपटाचे यश बघता महिलांचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीरेखा लाेक पसंत करतात; पण हे चिंताजनक असल्याचे समाज माध्यमांवरील या चित्रपटाच्या विराेधकांचे मत आहे. चित्रपट हा चित्रपटासारखा बघावा, ज्याचा उद्देश फक्त मनाेरंजन आहे असा तर्क काढणारेही समाजमाध्यमांवर कमी नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड‌्डी वांगा एका मुलाखतीत म्हणाले, मला जाणूनबुजून एक असामान्य प्रेमकथा तयार करायची हाेती. प्रेमासाठी एका व्यक्तीचे आयुष्य बदलण्याची ही कथा आहे. व्यक्तीरेखा जास्तीत जास्त वास्तविक आणि जशी आहे तशी ठेवण्याचा मी प्रयत्न केला . ही भूमिका साकारल्याबद्दल शाहिदवरही टीका हाेत आहे. त्याच्या समर्थनार्थ त्याची आई निलीमा अझीम म्हणतात, अशा भूमिकेसाठी हाॅलिवूडमध्ये आॅस्कर मिळताे. या सर्व वादात ३१२३ पडद्यांवर प्रदर्शित झालेल्या कबीर सिंहने ७ दिवसात १४० काेटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंहच्या यशानंतर त्याचा तमिळ रिमेक 'आदित्य वर्मा' ही येत आहे. 

 

'कबीर सिंह' मध्ये कशावर आहे आक्षेप? 
कबीर सिंह मध्ये अनेक दृष्यांवर आक्षेप घेतला आहे. शाहीदव्यक्तीरेखा विविध नशा करताना, शिव्या देताना, लाेकांना मारहाण करणारी दाखवली आहे. कबीर चाकूच्या धाकाने मुलींना कपडे काढण्यासाठी सांगताे, नायिकेला मारताे. मुलीची इच्छा न जाणताच ही फक्त माझीच आहे आणि तिच्याकडे काेणी बघायचे नाही अशी घाेषणा काॅलेजमध्ये करताे, नायिकेवर विवाहासाठी दबाव आणताे. अशा हरकती करूनही कबीरला बिचारा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कबीरची प्रेमिका प्रिती सिक्काची भूमिका करणाऱ्या कियारा आडवाणीला कबीरचा राग, गैरवर्तन आणि दबाव सहन करूनही त्याच्यासमाेर गाेगलगाय व्हावे लागते. ही दृष्ये पुरुषत्वाचे वाईट रूप आणि महिलांना दुर्बल दाखवणारे असल्याचे मानल्या जात आहे. 


पण 'कबीर सिंह'ने जे केले ते आधीही हाेत हाेते 
शाहरुख खानने १९९३ मध्ये आलेल्या 'डर' चित्रपटात प्रेमात पडणाऱ्या अतिवेड्या व्यक्तीचे पात्र साकारले हाेते . वास्तविक ही व्यक्तीरेखा खलनायक या रुपात सादर केली हाेती. १९९० मध्ये अमीर खान आणि माधुरी दीक्षितच्या राजा चित्रपटात नायक अपमानचा बदला घेण्यासाठी नायिकेवर जबरदस्ती करताे. तरीही नायिका त्याच्यावर प्रेम करू लागते. २००३मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटात नायिकेचे पात्र निर्जरा नायक राधे याच्या भीतीने जगते पण तरीही त्याच्यावर प्रेम करते. २०१३ मध्ये धनुष आणि साेनम कपूरच्या चित्रपटात नायक नायिकेवर दबाव आणण्यासाठी हाताची नस कापताेे, तिचा सतत पाठलाग करताे, तिला त्रास देताे. नायकाने जबरदस्ती, हिंसाचार करूनही नायिका नायकासमाेर नमते आणि हार मानते. बाॅलीवूडमध्ये अशा चित्रपटांची शंभर उदाहरणे मिळतील. बाॅलीवूड प्रथमपासूनच चित्रपटांत महिलांना कमी स्थान देत आले आहे. 

 

समाज : एक दशकात महिलांच्या विराेधातील गुन्ह्यांत ८३ % वाढ 
राष्ट्रीय गुन्हे नाेंद ब्युरोचा शेवटचा अहवाल २०१६ मध्ये जाहीर झाला हाेता. त्यानुसार देशात महिलांविरुद्ध दर तासाला ३९ गुन्हे घडत असून हे प्रमाण २००७ मध्ये २१ हाेते. पतीकडून झालेल्या छळाचे सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले. एका दशकात (२००७ ते २०१७ दरम्यान) महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात ८३ % वाढ झाली आहे. २०१६ मध्ये लग्नासाठी अपहरण करण्याची ३३,७९६ प्रकरणे समाेर आली व दर महिन्यात अॅसिड हल्ल्याची १८ प्रकरणे, तर दर आठवड्यात महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याची ८६ प्रकरणे नाेंदवण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या महिला विभागानुसार २९ % महिला काैटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात. देश लैंगिक समानतेच्या क्रमवारीत १२५, तर जागतिक लिंग असमानतेच्या यादीत ८७ व्या स्थानी आहे. आराेग्य मंत्रालयाने गतवर्षी जाहीर केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य पाहणीनुसार वयाच्या १५ वर्षीच प्रत्येक तिसऱ्या महिलेस काैटुंबिक हिंसेचा सामना करावा लागला आहे. या पाहणीतील धक्कादायक बाबत म्हणजे, ४० ते ४९ वयाच्या ५४.४ % महिलांनी काैटुंबिक हिंसेचे समर्थन केले. हे आकडे समाजातील महिलांची स्थिती दर्शवतात. गुन्ह्यांवर चित्रपटांच्या परिणामांचा विचार करता चित्रपटांपासून प्रेरित होऊन चोरी, हत्या वा लुटीच्या बातम्या आपण वाचत अथवा एेकत असताे. उदा- 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटानंतर मोबाइलवरून काॅप्या करण्याची अनेक प्रकरणे समाेर आली हाेती. 

 

महिलांची अवस्था व चित्रपटांचा परिणाम दाखवणारी ३ संशाेधने... 
हा खूप जुना वाद आहे की, चित्रपटांचा समाजावर परिणाम हाेताे काय? देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५५ मध्ये त्यांच्या एका भाषणात भारतात चित्रपटांचा परिणाम पुस्तके व वृत्तपत्रांच्या परिणामांपेक्षाही जास्त असल्याचे म्हटले हाेते. 'कबीर सिंह' हिट होणे व त्यातील आक्षेपार्ह दृश्ये पसंत केल्यामुळे महिलांची अवस्था व चित्रपटांच्या समाजावरील परिणामांवर चर्चा सुरू आहे. याच्याशी संबंधित तीन संशाेधने... 

 

रिसर्च 1 : महिलांच्या भूमिका कमकुवत; त्यांच्यासाठी भाषाही याेग्य नाही 
आयबीएम रिसर्च व ट्रिपलआयटी-दिल्लीने २०१८ मध्ये गत ५० वर्षांत आलेल्या सुमारे ४,००० चित्रपटांचा अभ्यास केला. त्यात चित्रपटांच्या कथेत महिला व पुरुषांचा उल्लेख कसा हाेताे व त्यांच्यासाठी काेणते शब्द, विशेषणे व क्रियांचा वापर हाेताे, हे पाहिले गेले. त्यातून ज्या कथेत पुरुषांचा उल्लेख सरासरी ३० वेळा झाला, त्यात महिलांचा केवळ १५ वेळा झाला. संशोधकांच्या मते यातून महिला पात्रांना जास्त महत्त्व दिले जात नाही. हीराेसाठी मजबूत, यशस्वी, प्रामाणिक आदी विशेषणे व 'मारले', 'गोळी झाडली', 'वाचवले', 'धमकावले' आदी क्रियांचा सर्वात जास्त वापर केला गेला, तर हीरोइनसाठी सुंदर, चांगली, विधवा, आकर्षक, सेक्सी आदी विशेषणे व 'लग्न केले', 'स्वीकारले', 'शोषण झाले', 'ती तयार झाली' आदी क्रियांचा माेठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. तसेच सुमारे ६० % महिला पात्रांना 'शिक्षक'ची भूमिका देण्यात आली, तर पुरुष पात्रांना वैविध्यपूर्ण भूमिका देण्यात आल्या. 

 

रिसर्च 2 : अल्पवयीनांना स्माेकिंगचे व्यसन लागण्याची शक्यता १६ पट 
अमेरिकेच्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अंॅड प्रिव्हेन्शन' या संस्थेने २००२, २००४, २००५ व २०१८ मध्ये सांगितले हाेते की, अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा विडी आेढण्याची सवय चित्रपटांमुळे लागते. सिगारेट-विडी न पिणाऱ्या अल्पवयीन मुले त्यांचे आवडीचे कलाकार पडद्यावर सिगारेट पिताना दाखवल्यास भवितव्यात तसे व्यसन करण्याची शक्यता १६ पट वाढते. या संस्थेच्या २०१८ मधील अभ्यासानुसार ज्या चित्रपटांत स्माेकिंगची दृश्ये दाखवली जात असल्यास त्यांना 'आर' रेटिंग दिल्यास अल्पवयीन स्मोकर्सचे प्रमाण १८ % पर्यंत कमी केले जाऊ शकते. 'आर' रेटिंगचा अर्थ म्हणजे- १७ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले पालकांसाेबत संबंधित चित्रपट पाहू शकतात. 

 


रिसर्च 3 : विचार आणि सरकारबद्दलचा दृष्टिकाेन बदलू शकतात चित्रपट 

२०१५ मध्ये अमेरिकेच्या डेटन विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक मिशेल सी पाॅट्झ यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर एक संशाेधन केले. त्यांनी त्यांच्याकडून सरकारबद्दची मते आणि सरकारला विचारता येतील असे प्रश्न मागवले. त्यांनी असे दाेन वेळा केले. 'आर्गाे'आणि 'झीरो डार्क थर्टी' सारखे यशस्वी चित्रपट दाखवण्याच्या आधी आणि नंतर. संशाेधनात दिसले की चित्रपट बघितल्यावर जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांचे सरकारबद्दलचे मत बदलले. त्यांचे प्रश्न सरकारच्या बाजूचे झाले. याचे कारण दाेन्ही चित्रपटात सरकार कमकुवत आणि त्यातील काही व्यक्तीरेखा प्रामाणिक आणि मेहनती दाखवण्यात आल्या. याबाबत सरकारने काही दिशानिर्देश जारी केल्यास स्थितीत काहीशी सुधारणा हाेऊ शकते. 
 

बातम्या आणखी आहेत...