आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप-बसपत लोकसभा निकालानंतर १० दिवसांतच फूट, यूपी विधानसभा पोटनिवडणूक बसप स्वबळावरच लढणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - लोकसभा निवडणूक निकालाच्या १० दिवसांतच यूपीत सप-बसप-रालोद आघाडी फुटीच्या मार्गावर आहे. बसप प्रमुख मायावती यांनी सोमवारी दिल्लीत लोकसभा निकालांचा आढावा घेतला. यूपीचे पक्ष पदाधिकारी आणि खासदारांच्या बैठकीत मायावती म्हणाल्या की, सपासोबतच्या आघाडीचा फायदा झाला नाही. आम्ही ही आघाडी विचारपूर्वक केली होती, तिचे फायदे-तोटे माहीत होते, पण या आघाडीमुळे फायदा झाला नाही. मते मिळाली असती तर यादव कुटुंबातील लोकांना पराभव पत्करावा लागला नसता. अखिलेश आपली पत्नी आणि भावाला निवडून आणू शकले नाहीत. सपच्या लोकांना आघाडीच्या विरोधात काम केले आहे. मुस्लिमांनी आम्हाला पूर्ण साथ दिली आहे.

 

ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह : मायावतींनी लोकसभा निकालांचा घेतला आढावा, ईव्हीएममध्ये घोटाळ्याचा केला आरोप

आढावा बैठकीत मायावतींनी विभागीय संयोजकांकडून प्रत्येक जागेची माहिती घेतली. त्या म्हणाल्या की, पक्ष यूपीतील सर्व ११ विधानसभा जागांवर होणारी पोटनिवडणूक स्वबळावर लढेल. पक्षाला आता पुढे ५० टक्के मतांचे उद्दिष्ट ठेवून राजकारण करायचे आहे.


मायावती यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही केला. त्या म्हणाल्या की, भाजप ईव्हीएम घोटाळ्यामुळे जिंकला आहे. त्याशिवाय यूपीच्या श्रावस्तीचे खासदार राम शिरोमणी वर्मा हेही म्हणाले की, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे आम्ही आधीपासूनच म्हणत आहोत. पण ना सरकार ऐकत आहे ना निवडणूक आयोग.

 

मायावतींनी सहा राज्यांचे प्रभारी हटवले, ३ राज्यांचे अध्यक्षही बदलले
मायावतींनी उत्तराखंड, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात आणि ओडिशा या ६ राज्यांच्या प्रभारींना हटवले आहे. दिल्ली, मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्षही बदलले. यूपीत बसप प्रदेशाध्यक्ष आर. एस. कुशवाह यांच्याकडून उत्तराखंडचे प्रभारीपद काढून घेतले आहे. मायावतींनी राजस्थानमधील बसपच्या आमदारालाही दिल्लीला बोलावले होते. हे आमदार दुसऱ्या पक्षात सामील होणार आहेत, अशी चर्चा सुरू होती.

 

बसपने यूपीमध्ये ३७ जागा लढल्या, १० जिंकल्या; सपने ३५ जागा लढल्या, ५ जिंकल्या
बसपने देशभर लोकसभेच्या ३०० जागा लढल्या होत्या. यूपीत बसपने सप आणि रालोदशी आघाडी केली होती. बसपने तेथे ३७ जागांवर निवडणूक लढवली आणि १० जागा जिंकल्या. इतर राज्यांत बसपला एकही जागा मिळाली नाही. दुसरीकडे, सपने ३५ जागांवर निवडणूक लढवली होती. पक्षाला ५ जागांवर विजय मिळाला. रालोदने ३ जागांवर निवडणूक लढवली होती, या पक्षाला एकही जागा मिळाली नाही.