आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मापासूनच नाहीत हात, पायांने शिकले सगळे काम; आता विमान उडवते, स्कूबा डायव्हिंगदेखील करते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेत राहणारी जेसिका कॉक्स साधारण महिला नाहीये. जन्मापासून तिला दोन्ही हात नाहीयेत, तरीदेखील ती अशी कामे करते जी करण्याचा सामान्य लोक विचारदेखील करू शकणार नाहीत. विशेष म्हणजे हात नसतानाही ती विमान उडवते, ते पण आपल्या दोन्ही पायांच्या मदतीने. लहानपणापासून जेसिकाला कृत्रिम (प्रोस्थेटिक) हात लावण्याचा पर्याय होता. पण तिने कधीच ते लावले नाही आणि आपल्या पायांच्या जोरापर आपले स्वप्न पूर्ण केले.


जेसिकाचा आई इनेज यांची प्रेग्नंसी सामान्य होती, पण तरिही जेसिकाचे जन्मापासून हात नव्हते. मुलीच्या या परिस्थितीमुळे इनेजला खूप दुखः झाले, पण तिने कधीच हे बोलून दाखवले नाही. जेसिकाने सांगितले की, मोठी होत असताना कुटुंबाने कधीच तिला एकटे पडू दिले नाही, तिची प्रत्येक परिस्थितीत साथ दिली. त्यामुळे जेसिका आपले सगळे श्रेय आपल्या आई-वडिलांना देते.


हिमतीने पूर्ण केले सगळे काम
मोठे होणे जेसिकासाटी सोपे काम नव्हते. ज्या गोष्टी इतरांसाठी सोप्या असायच्या त्या जेसिकासाठी खूप अवघड होत्या. तरिदेखील तिने कृत्रिम हात लावण्यास नकार देत आपल्या पायांनीच सगले कामे केली. कॉलेजमध्ये असताना तिने टॅप डांस, स्वीमिंग आणि मॉडलिंग शिकली. त्यानंतर तायक्वांडोमध्ये थर्ड डिग्री ब्लॅक बेल्ट मिळवला. स्कूबा डायव्हिंगमध्येही तिने प्राविण्य मिळवले. तिने आतापर्यंत मोटिव्हेशनल स्पीकर म्हमून 20 पेक्षा जास्त देशात दौरे केले आहेत.


सोपे नव्हते ट्रेन्ड पायलटसारखे विमान उडवणे
जेसिकाने सांगितले की, विमान उडवण्याची हिम्मत तिला एका पायलटकडूनच मिळाली. म्हणाली, "लहानपणी मी जेव्हा विमानात बसायचे,  तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना करायचे. पण एकदा एका पायलटने मला घाबरलेली पाहून कॉकपिटमध्ये बोलावले. मला त्याने सोबत बसवले आणि विमान उडवण्यास सांगितले, त्यानंतर मी वैमानिक होण्याचे ठरवले.”  


2005 मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनामधून ग्रॅजुएशन केल्यानंतर पायलटची ट्रेनिंग सूरू केली, पण ते काम सोपे नव्हते. ट्रेनर्सना खूप अवघड होते माझ्यासारख्या हात नसलेल्या व्यक्तीला शिकवणे. पण शेवटी 2008 मध्ये ती एक ट्रेन्ड पायलट झालीच. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने तिला लाइट स्पोर्ट्स एअरक्राफ्ट उडवण्याची परवानगी दिली.

बातम्या आणखी आहेत...