आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरसोबत पुढच्यावर्षी लग्न करु शकते मलायका अरोरा, आजीसुध्दा नातवावर टाकतेय लग्नाचा दबाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चा दिर्घकाळापासून सुरु आहेत. नुकतेच अर्जुन कपूर आणि मलायका मुंबई एयपोर्टवर इटलीहून परतताना एकत्र स्पॉट झाले. यापुर्वी ते 'इंडियाज गॉट टॅलेंज' रियलिटी शोमध्ये एकमेकांचा हात पकडून दिसले होते. आता हे दोघं त्यांचे नाते पुढच्या लेव्हलला घेऊन जाणार अशा चर्चा आहेत. फिल्मफेअरनुसार, मलायका आणि अर्जुन 2019 मध्ये लग्नाची प्लानिंग करत आहेत. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. अर्जुन 33 वर्षांचा आहे तर मलायका 45 वर्षांची आहे. 


फिल्मफेअर रिपोर्टनुसार, मलायका आणि अर्जुन एकमेकांना खुप पसंत करतात. दोघांनी कधीच पब्लिकली रिलेशनशिप अॅक्सेप्ट केलेली नाही. पण दोघं आपल्या पर्सनल स्पेसमध्ये खुप आनंदी आहेत आणि आता आपल्या नात्याला पुढच्या लेव्हलवर घेऊन जाणार आहेत. मलायकाने 24 अक्टोबरला आपला 45 वा वाढदिवस अर्जुन कपूरसोबत सेलिब्रेट केला. दोघ जवळपास 1 आठवडा इटलीमध्ये राहिले. सेलिब्रेशननंतर दोघंही एकाच फ्लाइटमधून भारतात आले, पण एयरपोर्टवर मलायका आणि अर्जुन एकमेकांपासून दूर-दूर दिसले. काही दिवसांपुर्वी मलायकाने हॉलिडे लोकेशनवरुन आपले फोटो शेअर केले होते. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, "We found LOVE in a hopeless place, He looks at me like nobody else does with"


रियलिटी शोमध्ये हातात हात घालून दिसले होते अर्जुन-मलायका 
मलायकाच्या वाढदिवशी तिचा एक डान्स व्हिडिओही व्हायरल झाला होता. यामध्ये ती कथित बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत डान्स करताना दिसली होती. हा व्हिडिओ 'इंडियाज गॉट टॅलेंट' च्या सेटवरील होता. येथे मलायका आणि अर्जुन 'फ्लाइंग जट'चे गाणे 'बीट पे बूटी'वर थिरकताना दिसले होते. अर्जुन येथे त्याच्या 'नमस्ते इंग्लँड' चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा होस्ट भारतीने मलायका आणि अर्जुनला स्टेजवर बोलवून डान्स करायला लावला होता. दोघंही यावेळी एकमेकांचा हात पकडून दिसले होते. 
'इंडिया गॉट टॅलेंट'च्या सेट व्यतिरिक्त दोघं डिझायनर संदीप खोसलाच्या पार्टी दरम्यान एकाच कारमधून आले होते. दोघं कुणाल रावलच्या फॅशन शोमध्येही एकत्र बसलेले दिसले होते. शोमधून बाहेर पडल्यानंतरही दोघं एकमेकांचा हात पकडून दिसले होते.

 

आजी टाकतेय अर्जुनवर दबाव
33 वर्षांच्या अर्जुन कपूरच्या आजीला त्याच्या लग्नाची चिंता आहे. त्याच्या आजीने त्याला लग्न करण्यासाठी धमकी दिली आहे. अर्जुन कपूरच्या वाढदिवशी आजी निर्मल कपूर यांनी त्याला एका गिफ्टसोबत चिठ्ठी पाठवली होती. यामध्ये लिहिले होते की- आनंदी राहा आणि लवकर लग्न कर्. या लेटरचा फोटो अर्जुन कपूरने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याने लिहिेल होते की, - 'जेव्हा आपली आजी गिफ्टसोबतच धमकी, रिक्वेस्ट, रिश्वत आणि आदेश सर्व एकाच वेळी देते.' नंतर अर्जुन म्हणाला होता की, तो येणा-या 2-3 वर्षांमध्ये लग्नाविषयी विचार करेल. तर एका एन्टटेन्मेंट वेबसाइटनुसार, काही महिन्यांपुर्वी पापा बोनी कपूर यांनी अर्जुन कपूरला मलायकापासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. 
 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...