आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. श्रीदेवीच्या निधनानंतर त्यांच्या मुली खुशी आणि जान्हवीला अर्जुन कपूरने पुर्ण सपोर्ट केला. अर्जुन कपूर पहिले श्रीदेवीला आपल्या वडिलांची फक्त बायको समजत होता. तो खुशी-जान्हवीला बहिणी मानत नव्हता. अर्जून कपूर रविवारी रात्री बहिण जान्हवी कपूरसोबत 'कॉफी विद करन 6' मध्ये पोहोचला होता. जान्हवी आणि खुशीला साथ द्यावी असे अर्जुनला केव्हा वाटले याविषयी त्यांने सांगितले. अर्जुन म्हणाला - "माझ्या आईचे निधन झाले तेव्हा माझ्यावर ही वेळ आली होती. हे कुणा शत्रूसोबतही होऊ नये असे मला वाटते. मी आणि अंशूलाने जे काही केले ते पुर्ण खरेपणाने केले. अशा वेळी कुणाच्या सपोर्टची किती गरज असते हे मला आणि अंशुलाला माहित होते, कारण आम्हाला कुणाचा सपोर्ट मिळाला नव्हता. पण हे करण्यापुर्वी अंशुलाचा सल्ला विचारणे मला गरजेचे होते.मी रात्री 2-3 वाजता अंशुलाला फोन केला आणि आणि म्हणालो की, ही योग्य वेळ आहे, तुला काय वाटते? यावर तिने पहिले प्रश्न केला की, दोन मुली(जान्हवी, खुशी) कुठे आहेत? तिचे हे बोलणे ऐकूण मी त्यांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला." अर्जुन म्हणाला की, आज जर माझी आई जिवंत असती, तर तीसुध्दा सर्व काही विसरुन मदत कर असेच म्हणाली असती. कारण आयुष्य खुप लहान आहे.
जेव्हा जान्हवी म्हणाली - मला वाटते की, घरात कुणी माझ्यावर प्रेम करत नाही
- शोच्या एका सेगमेंटदरम्यान करण जोहरने अर्जुन आणि जान्हवीला घरातील एका सदस्याला फोनवर 'हे करण व्हॉट्सअप' असे म्हणण्यास सांगितले. तेव्हा जान्हवीने अंशुलाला फोन लावला आणि करणने सांगितलेले वाक्य बोलायला सांगितले. पण अर्जुन मध्येच तिला थांबवत म्हणाला की, जर तु माझ्यावर प्रेम करत असशील तर असे करणार नाही. फायनली अंशुलाने जान्हवीला साथ दिली नाही. यावर जान्हवी अंशुलाला म्हणाली की, "तु मला हर्ट केलेय, मी पाहून घेईल." तर अर्जुनने वडील बोनी कपूर यांना फोन लावून हे वाक्य बोलण्यास सांगितले. यावेळी जान्हवीने बोनी कपूर यांना असे न करण्यास सांगितले. पण बोनी यांनी अर्जुन कपूरला साथ दिली आणि 'हे करण व्हॉट्सअप' असे म्हटले. जान्हवी बहीण आणि वडिलांचे उत्तर ऐकूण नाराज झाली आणि म्हणाली की, "मला वाटते की, कुटूंबात कुणीही माझ्यावर प्रेम करत नाही."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.