आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Kapoor And Malaika Arora Hold Hands At Milan Airport Make Their Relationship Official, Now Social Media User Trolling

इटलीमधून लीक झाले अर्जुन-मलायकाचे फोटो, सोशल मीडियावरुन दोघांवर होतेय टिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. मलायका अरोडा नुकतीच इटलीमध्ये आपला वाढदिवस साजरा करुन परतली. याच काळात इटलीमधून अर्जुन कपूर (33) आणि मलायका अरोडा (45) यांचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये मलायका आणि अर्जुन हातात हात घालून दिसत आहेत. मलायका-अर्जुनचा हा फोटो मिलान(इटलीती शहर) एयरपोर्टचा आहे. हा फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत. यासोबतच सोशल मीडिया यूजर्सने अर्जुनवर निशाना साधला आहे. अर्जुनसोबतच यूजर्स बोनी कपूरलाही ट्रोल करत आहेत. एकाच फ्लाइटमधून भारतात परतलेले मलायका आणि अर्जुन बुधवारी मुंबई एयरपोर्टवर एकत्र दिसले होते. पण फोटोग्राफर्सला पाहून दोघं दूर-दूर झाले होते.


सोशल मीडिया यूजर्स म्हणाले जसा बाप तसा मुलगा 
- सोशल मीडिया यूजर्सने कपलचा हातात हात घातलेला फोटो पाहून अर्जुनला ट्रोल करणे सुरु केले. एका यूजरने लिहिले, "जैसा बाप वैसा बेटा, सो चीप, अर्जुनने श्रीदेवीला आपल्या अनेक मुलाखतींमध्ये जज केले आहे आणि आता कर्म परत आले. आता लोक अर्जुनला जज करतील. काय सांप आहे, अर्जुनच्या आईचे निधन झाल्यानंतर सलमानच्या कुटूंबाने सपोर्ट केला, आता त्याने अशी परतफेड केली आहे."
- दूस-या यूजरने लिहिले, "बोनी कपूरला जेव्हा पैशांची गरज होती, तेव्हा सलमानने फ्रीमध्ये 'नो एंट्री'चित्रपट केला होता. याच चित्रपटामुळे बोनी रिकव्हर झाले होते. आता कपूर कुटूंबाने याची चांगली परतफेड केली आहे." गेल्यावर्षी मलायकाने सलमानचा भाऊ अरबाजसोबत घटस्फोट घेतला होता.
- एका यूजरने लिहिले - "बोनी आणि अर्जुन दोघंही खान कुटूंबासाठी एकदम साप निघाले. ज्या ताटात खातात, त्याच ताटात थुंकतात, लाज वाटू द्या."

 

यूजर्स मलायकाला म्हणाले आंटी 
-एका यूजरने मलायकावर निशाना साधत कमेंट केली, "चित्रपटाच्या प्रमोशनच्या काळात अर्जुन आंटी(मलायका)चा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉलिडेवर गेला. प्रेम खरंच अंधळे असते. मलायकाचा चेहरा पाहून कळते की, तिला हे रिलेशन स्वीकार करताना अंबेरेस्मेंट होते."
- दूस-या सोशल यूजरने लिहिले, "मलायका अरबाजसोबत होती, तेव्हाच या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. हे दोघं सीरियस आहेत? काय माहित अर्जुन येण्यापुर्वीच अरबाज-मलायकाच्या आयुष्यात अडचणी सुरु झाल्या असतील."

 

रियालिटी शोच्या सेटवर अर्जुन-मलायकाने एकत्र केला होता डान्स 
- 45 व्या वाढदिवसाच्या पुर्वीच मलायकाने अर्जुनसोबत रियालिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डान्स केला होता. अर्जुन येथे त्याच्या 'नमस्ते इंग्लंड'च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता.
- या दरम्यान दोघांनी स्टेजवर 'बी पे बूटी' गाण्यावर डान्स केला. अर्जुन आणि मलायका

एकमेकांचा हात पकडून स्टेजवर पोहोचले होते.
- मलायका आणि अर्जुन अनेक वेळा पब्लिकली एकत्र दिसले आहेत. पण अजूनही त्यांनी आपले नाते स्विकारलेले नाही. गेल्या काही दिवसांपुर्वी डिझाइनर संदीप खोसलाच्या पार्टी दरम्यान ते एकाच कारमध्ये दिसले होते. दोघं कुणाल रावलच्या फॅशन शोमध्येही एकत्र बसलेले दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...