• Home
  • Gossip
  • Arjun Kapoor can celebrate his Birthday in London, spoted with Malaika Arora at the airport

Bollywood / लंडनमध्ये बर्थडे साजरा करू शकतो अर्जुन कपूर, एअरपोर्टवर मलायका अरोरासोबत झाला स्पॉट 

स्टायलिश लुकमध्ये दिसले कपल

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 04:42:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बी-टाउनच्या सर्वात चर्चित आणि सर्वांच्या आवडत्या कपल्सपैकी एक आहेत. सोमवारी रात्री दोघे मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते. कपल शॉर्ट व्हॅकेशनसाठी रावण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन-मलायका लंडनमध्ये करिना कपूर आणि करिश्मा कपूरला जॉईन करणार आहे.

लंडनमध्ये होईल बर्थडे सेलिब्रेशन...
26 जूनला अर्जुन आपला 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याप्रसंगी कपल आपले खास फ्रेंड्स करिश्मा, करिना आणि सैफ अली खानसोबत एन्जॉय करणार आहे. याव्यतिरिक्त 25 जूनला करिश्माचा बर्थडे कपल जॉईन करणार आहेत. करिश्मा सध्या बहीण करिना आणि सैफसोबत लंडनमध्ये आहे आणि तिथेच आपला वाढदिवस साजरा करणार आहे. मलायका, करिश्मा आणि करिनाची खास मैत्रीण आहे. याबरीबरच ती अर्जुनचा बर्थडेदेखील खास बनवू इच्छिते.

स्टायलिश लुकमध्ये दिसले कपल...
एअरपोर्ट लुकबद्दल बोलायचे तर मलायका रेड ट्रॅक सूट आणि व्हाइट स्पोर्ट्स शूजमध्ये दिसत आहे. तसेच अर्जुन कॅज्युअल लुकमध्ये दिसला. त्याने ब्लू जीन्स आणि ब्लॅक-ब्लू टी शर्ट घातले होते. अर्जुन लवकरच चित्रपट 'पानीपत' मध्ये दिसणार आहे. यासाठी त्याने खास हेअर स्टाइल ठेवली आहे. आपल्या लुक तो सध्या मीडियापासून दूर ठेऊ इच्छितो आणि यामुळे तो जास्तीत जास्त वेळा कॅप लावलेला दिसतो. एअरपोर्टवरदेखील तो कॅप लावूनच आलेला दिसला.

X
COMMENT