आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरने केले जाहीर; रिलेशनशिपमध्ये असुन लग्न करण्याची इच्छा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा तुम्ही ऐकले असेलच.  काही दिवसांपुर्वी अर्जुन कपुरने स्वत: दोघांच्या अफेअरबद्दल खुलासा केला आहे. काही दिवसांपुर्वी अर्जुन 'कॉफी विद करन' या शोमध्ये दिसला होता. त्याच्यासोबत त्याची छोटी बहिण जान्हवीही सहभागी झाली होती.

 

> या शोमध्ये करनने अर्जुनला त्याच्या अफेअरबद्दल विचारले असता त्याने रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. करनने त्याला लग्नाविषयी विचारल्यावर त्याने सांगितले की, 'सुरवातीला लग्न करण्याचा विचार नव्हता परंतु आता आहे.' अशाप्रकारे त्याने मलायकासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला आहे. सध्या अर्जुन आणि मलायका अनेक ठीकाणी स्पॉट झाले आहे. परंतु दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी बोलण्यास नकार दिला आहे.

 

अर्जुनच्या फिटनेसची मलायका घेते काळजी

मलायका आणि अर्जुन यांनी भलेही त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला नसेल परंतु दोघांमध्येही जबरदस्त बाँडिग दिसत आहे. सुत्रांनी सांगितल्यानुसार, मलायका स्वत: अर्जुनच्या फिटनेसची काळजी घेत आहे. 'नमस्ते लंडन' या फिल्ममध्ये अर्जुनच्या लठ्ठपणामुळे अनेकांनी त्याच्यावर टिका केली होती. त्यानंतर स्वत: मलायकाने अर्जुनचा फिटनेस आणि डायट प्लॅन तयार केला असुन शूटींगदरम्यानही मलायका त्याच्या खाण्याकडे लक्ष देत आहे.

बातम्या आणखी आहेत...