Home | Gossip | arjun kapoor film 'India's most wanted' teaser released

अर्जुन कपूरने घेतली शपथ, एका दहशतवाद्याला पकडणार तेही विना हत्यारांचे, रिलीज झाला आहे 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चा टीजर : Video

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 03:11 PM IST

5 लोक कोणत्याही सपोर्टशिवाय पकडणार इंडियन 'ओसामा' ला... 

 • arjun kapoor film 'India's most wanted' teaser released

  मुंबई : अर्जुन कपूरची मोस्टअवेटेड फिल्म 'इंडियाज मोस्ट वांटेड' चा टीजर रिलीज झाला आहे. अर्जुन कपूरने हा टीजर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर करून लिहिले आहे, ‘भारताच्या ओसामाला पकडण्याची एक अविश्वसनीय कहाणी. असे ऑपरेशन जे बंदुकीशिवाय झाले.’ अर्जुन कपूरच्या 'इंडियाज मोस्ट वाँटेड' विषयी आणखी एक माहिती समोर आली आहे. चित्रपटाशी जोडलेल्या एक सूत्रानुसार.., इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख आणि अतिरेकी यासीन भटकळ याला पकडण्याच्या मोहिमेवर हा चित्रपट आधारित आहे. 2013 मध्ये बिहार पोलिसांनी यासीनला पकडण्यासाठी एसओजी म्हणजेच स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप बनवला होता. अर्जुन या चित्रपटात त्या टीमला लीड करणाऱ्या बिहारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी सत्य घटनेवर आधारित 'रेड' हा चित्रपट बनवला होता. तो प्रचंड गाजला होता.

  टीझर लाँच...
  या चित्रपटात भरपूर संवाद आहेत. अर्जुनसह चार लोकांची टीम यासीनला पकडण्याचा प्रयत्न करते. टीझरमध्ये यासीनचे पात्र साकारणाऱ्या कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नाही. हा चित्रपट 24 मे रोजी रिलीज होईल.

  सहा महिन्यांची मोहीम दाखवणार तीन दिवसांत...
  खरं तर, यासीनला पकडण्याचे ऑपरेशन सहा महिने चालले होते. मात्र, या चित्रपटात फक्त तीन दिवसांतच सर्व काही दाखवले जाणार आहे. चित्रपटाची कथा 13 ऑगस्ट 2013 ला सुरू होते. जेव्हा बिहार पोलिसांकडून यासीनला पकडण्यासाठी एसओजी म्हणजेच स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप बनवला जातो. या ग्रुपचे अधिकारी पर्यटक बनून नेपाळच्या पोखरा भागात जातात.

  काय आहे कथेत...
  या चित्रपटातून आणखी एका मजेदार गोष्टीचा खुलासा करण्यात येईल. ती म्हणजे, बिहार पोलिसांच्या टीमला दिल्लीत बसलेल्या आयबीच्या अधिकाऱ्यांकडून अपडेट मिळत असते. टीम जेव्हा पोखरा येथे जाऊन यासीनला पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा आयबी अधिकाऱ्यांकडून अडचणी येतात. दुसरीकडे बिहार पाेलिसांच्या टीमला नेपाळमधून आपल्या खबऱ्याकडून यासीन वेश बदलून राहत असल्याचे कळते. त्यानंतर खबऱ्यावर विश्वास ठेवून बिहार पोलिसांचा अधिकारी जोखीम पत्करत नेपाळला जातो. पुढे काय होते ते चित्रपटात आहे.

  वस्तुस्थिती...
  यासीनच्या अटकेची कारवाई सहा वर्षांपूर्वी 30 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आली होती. यासीन भटकळच्या अटकेसाठी बिहार पोलिसांचे विशेष पथक मोतिहारी आणि नेपाळला गेले होते. या संपूर्ण विषयावरील मनोरंजक गोष्ट अशी की, यासीनला सहज अटक करण्यात यश मिळाले होते.

Trending