आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 दिवस चेहरा लपवल्यानंतर अर्जुनने काढले मास्क, नंतर सोशल मीडियावर केले जातेय ट्रोल, लोक म्हणाले - यापेक्षा तर चेहरा लपवून ठेवायचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अर्जुन कपूर बुधवारी रात्री गर्लफ्रेंड मलायका अरोराची बहीण अमृताच्या घरी पोहोचला. ब-याच दिवसांनंतर अर्जुनच्या चेह-यावर मास दिसले नाही. अर्जुनचा चेहरा स्पष्ट दिसत होता. खरेतर अर्जुनने आशुतोष गोवारिकरच्या 'पानीपत' चित्रपटासाठी नवीन लूक केला आहे. यामध्ये त्याला मिशा दिसत आहेत. जवळपास 10 दिवस चेहरा लपवल्यानंतर तो विना मास्कचा समोर आला. त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडिया यूजर्स त्याला ट्रोल करत आहेत.


एक यूजर म्हणाला - चेहरा झाकून ठेव 
- अर्जुनच्या नवीन लूकविषयी ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, "अर्जुन हे लपवत होता तर, त्याने चेहरा झाकूनच ठेवला पाहिजे."
- यूजरने कमेंट केली की, "यापेक्षा तर चेहरा झाकून ठेवला असता." एका यूजरने अर्जुनची तुलना वॉचमनसोबत केली. त्याने लिहिले की, "एखाद्या बिल्डिंगच्या वॉचमनप्रमाणे दिसतोय."
- तर एका यूजरने लिहिले की, "तो याला असे लपवत होता, जसे कोहिनूर आहे."

अमृताच्या घरी मलायका अरोरा आणि करीनाही पोहोचल्या 
- अर्जुनसोबतच त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराही अमृताच्या घरी पोहोचली. अर्जुन आणि मलायका वेगवेगळ्या कारमधून पोहोचले. करीना कपूर येथे मुलगा तैमूरसोबत दिसली. अमृताच्या घरी जाताच तैमूर फोटोग्राफर्सला पोज देण्यास तैयार झाला. पण आई त्याला उचलून मधे घेऊन गेली.
 

 

बातम्या आणखी आहेत...