आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arjun Kapoor Said \'i Am Just 33 Years Old, I Have So Much Time To Get Marry\'

रिअॅक्शन : मलायकासोबत लग्नाच्या बातम्यांवर बोलला अर्जुन कपूर, म्हणाला - \'मी आता 33 वर्षांचा आहे, लग्नाची घाई नाही\'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागच्या कित्तेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. लग्नाशी निगडित डेट्स, डेस्टिनेशन ठरवण्याच्या बातम्याही येत आहेत. पहिले सांगितले गेले होते की, अर्जुन-मलायका 19 एप्रिलला लग्न करणार आहेत पण असे झाले नाही. आता या कपलच्या जूनमध्ये लग्न करणार असल्याच्या अफवा येत आहेत. याबाबत अर्जुन कपूरने मीडिया इंटरव्यूमध्ये सांगितले होते.  

अर्जुन म्हणाला नाही, मी लग्न नाही करत आहे, मी आता 33 वर्षांचा आहे आणि मला लग्नाची काही घाई नाही. जर मी लग्न केले तर लोकांना कळेलच. आजकाल एका मर्यादेनंतर काहीही लपत नाही. अंदाज लावल्याने काही नुकसान नाही होत पण प्रत्येकवेळी त्यावर प्रतिक्रिया देणे मला आवडत नाही. याव्यतिरिक्त सतत प्रतिक्रिया देणे थकवणारे होते. या विषयावर गरजेपेक्षा जास्त गॉसिप झालेले आहेत पण माझ्या मनात कुणाविषयी कोणताच राग नाही. या इंटरव्यूमध्ये अर्जुनने मान्य केले की, मलायका त्याच्यासाठी स्पेशल आहे. 

मलायकानेही दिली होती प्रतिक्रिया... 
मलायकानेही मागील काही दिवसात अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले होते. मलायकाने मीडियासोबत बातचितीमध्ये सांगितले, हे सर्व खोटे आहे आणि यामध्ये काहीही सत्यता नाही. झाले असे की, अडीच वर्षांपूर्वी अरबाज खानसोबत लग्न तुटल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनविषयी होणाऱ्या चर्चा सामान्य झाला होत्या. दोघे काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करून परतले आहेत. मलायका 45 वर्षांची आहे.