आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Kapoor Sanjay Dut Starer ​​​​​​​panipat Trailer  Social Media Reaction

ट्रेलरमध्ये नेटक-यांना अर्जुन कपूर वाटला फेल, संजय दत्तचे केले कौतुक,  'पद्मावत'-'बाजीराव मस्तानी'सोबत तुलना 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी दुपारी 12 वाजता रिलीज करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्यांच्या  ट्विटर अकाऊंटवरुन चित्रपटाच्या ट्रेसलची लिंक शेअर केली.  ट्रेडिंगमध्ये ट्रेलर नंबर वनवर पोहोचला. पण सोशल मीडियावर ट्रेलरला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. 

संजय दत्तचे कौतुक तर अर्जुन कपूर होतोय ट्रोल
 ट्रेलर बघून नेटकरी त्याची तुलना 'बाजीराव मस्तानी' आणि' पद्मावत'सोबत करत आहेत. लोकांच्या मते अर्जुन कपूर 'पानिपत'मध्ये 'बाजीराव मस्तानी'तील रणवीर सिंगसारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करतोय.  सदाशिवरावांच्या भूमिकेत अर्जुन शोभून दिसत नाहीये.

तर दुसरीकडे लोक संजय दत्तचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर लोक संजय दत्तच्या लूक आणि अभिनयाचे कौतुक करत आहेत. चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूरसह  क्रिती सेनन, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

14 जानेवारी 1761 या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावर हा चित्रपट बेतला आहे. पानिपतची लढाई ही मराठे हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. अहमद शाह अब्दालीने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाची. या युद्धात सदाशिवरावांना वीरमरण आले होते. हाच इतिहास आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटात मांडला आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...