आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाशिवराव भाऊच्या भूमिकेत अर्जुन कपूर, तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त, क्रिती सेननचाही लूक आला समोर  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर आता पानिपतच्या लढाईवर चित्रपट घेऊन येत आहेत. येत्या 6 डिसेंबर रोजी त्यांनी दिग्दर्शित केलेला 'पानिपत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातील कलाकारांचे लूक समोर आले आहेत. चित्रपटात संजय दत्त हा अभिनेता अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता अर्जुन कपूर सदाशिवर राव आणि अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईच्या भूमिकेत झळकणार आहे. या तिघांच्याही लूकचे फोटो आशुतोष गोवारीकर यांनी ट्विट केले आहेत. अर्जुन, संजय आणि क्रिती यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्यांदाच या चित्रपटातील हे लूक समोर आले आहेत. उद्या म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलरही आऊट होणार आहे.

पानिपतची लढाई ही मराठे हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. अहमद शाह अब्दाली याने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही.सदाशिवरावभाऊ या युद्धात कामी आला. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकर मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. 

या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनान यांच्यासह अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचीही महत्त्वाची भूमिका आहे. पण अद्याप तिचा लूक रिव्हिल करण्यात आलेला नाही.  नानासाहेब पेशवा यांच्या पत्नी असलेल्या गोपिका बाई यांची भूमिका पद्मिनी कोल्हापूरे साकारणार आहे.  प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने या चित्रपटाला संगीत दिले आहे.

चित्रपटाचे कथासार
पानिपतची काही स्थळे व गावे यात दिसतील. मराठ्यांचे सैन्य पानिपतजवळील भादड गावात येऊन थांबले होते. सदाशिवराव भाऊ यांचा तंबू इसरानाजवळील एका मोकळ्या जागेत टाकण्यात आला होता. येथेच भाऊपूर नावाचे गाव नंतर वसवले गेले. भादड गाव युद्धाची प्रमुख भूमी होते. विश्वासराव मारले गेल्यानंतर सदाशिवराव भाऊ हत्तीवरून खाली उतरतात. तेव्हा सैन्याला वाटते, तेही मारले गेले. यामुळे सैन्याचे मनोधैर्य खचते आणि सैन्य सैरावैरा धावत सुटते. यामुळे येथे भादड गाव वसले. मराठ्यांनी येथे प्रगटेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर अाजही तेथेच आहे. येथे एक झाड लावण्यात आले होते. याच मंदिराच्या धर्तीवर त्यांनी देवीचे मंदिर बांधले. मराठ्यांचे ऐतिहासिक स्थळ उग्राखेडी गावात काला अम्ब मंदिर आहे.

अशी आहेत पात्रे
सदाशिवराव भाऊ यांना भाऊसाहेबही म्हटले जात होते. चित्रपटात त्यांची भूमिका अर्जुन कपूर साकारणार आहे. अहमदशाह अब्दाली दुर्राणी नावानेही ओळखला जातो. त्याच्या भूमिकेत संजय दत्त आहे. अब्दाली कवी होता. यामुळे संजय दत्त कविता सादर करताना दिसेल. सदाशिवराव भाऊ यांचे खासगी आयुष्य या चित्रपटात दिसेल.

बाजीराव-मस्तानीशी लिंक 
या चित्रपटाचा संबंध बाजीराव-मस्तानी चित्रपटाशी आहे. सदाशिवराव हे बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांचे सुपुत्र होते. संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव पेशव्यांवर चित्रपट काढला होता. यात बाजीरावांची भूमिका रणवीरसिंह व मस्तानीच्या भूमिकेत दीपिका पदुकाेण होती, तर काशीबाईंची भूमिका प्रियंका चोप्रा हिने साकारली होती.