आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Kapoor Lashes Out At Trollers Abusing Anshula Kapoor For Not Helping Janhvi Kapoor On Koffee With Karan

अर्जुन कपूरच्या धाकट्या बहिणीला बलात्काराची धमकी, सोशल मीडियावर शिविगाळ करणा-यांना अर्जुनने दिले त्यांच्याच भाषेत उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  अभिनेता अर्जुन कपूरची बहीण आणि बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर हिला बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा खुलासा स्वतः जान्हवी कपूरने केला आहे. अलीकडेच जान्हवी प्रियांका चोप्राच्या लाइव्ह एथोन या शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने याचा खुलासा केला.  जान्हवीने सांगितले, 'माझ्या बहिणीला अलीकडेच सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. कॉफी विथ करन या शोमध्ये तिने माझी बाजु न घेता भाऊ अर्जुनची साथ दिली होती, तेव्हापासून तिला सोशल मीडियावरुन धमक्या येऊ लागल्या. हे सगळं कळल्यानंतर मी शॉक्ड झाले. सोशल मीडियाचा वापर करताना लोक मर्यादा ओलांडतात, त्यांना वाटतं की आपण काहीही करु शकतो. '


नेमके काय घडले होते.. 
‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अर्जुन आणि जान्हवीने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये हजेरी लावणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीला एक टास्क दिला जातो. ज्यामध्ये त्या सेलिब्रिटींनी दुसऱ्या सेलिब्रिटींना फोन करून ‘हाय करण इट्स मी,’ असं बोलण्यास सांगावं लागलं. जो सर्वांत आधी फोन उचलून करणला ‘हाय’ बोलतो, तो या टास्कमध्ये जिंकतो. जान्हवीने या टास्कदरम्यान सावत्र बहीण अंशुलाला फोन लावला होता. अंशुलाने तिचा फोन उचलला खरा पण गोंधळामुळे तिला काय बोलावं हेच समजलं नाही. त्यामुळे जान्हवी या टास्कमध्ये हरली. पण यावरून सोशल मीडियावर अंशुलावर जोरदार टीका होऊ लागली.  अंशुलाने जान्हवीची मदत न केल्याने तिच्यावर जोरदार टीकाटिप्पणी होऊ लागली. इतकंच नव्हे तर तिला बलात्काराच्या, जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या. या सर्व प्रकारानंतर भाऊ अर्जुनने सोशल मीडियावर टिकाकारांना सुनावले आहे. 


अर्जुनने दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर... 
आपल्या बहिणींच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहणाऱ्या अर्जुनने मात्र या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. ‘कॉफी विथ करणमध्ये जे घडलं त्याला इतकं महत्त्व देण्याची गरज नाही असं मला वाटलं होतं. पण आता मी माझ्या भाषेवर आणखी संयम ठेवू शकत नाही. आमच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती तुमच्या आई किंवा बहिणींवर कधीच ओढवू नये अशी मी आशा करतो,’ असं ट्विट त्याने केलं. 

Something I assumed was an absolute non issue on Koffee with Karan has escalated into @anshulakapoor being abused & I can’t be bothered by protocol anymore. F**k all those trolls who wish harm to my sister. I hope ur mom or sister never have to go thru what u have put us thru...

— Arjun Kapoor (@arjunk26) November 27, 2018

 

जान्हवीनेही केली बहिणीची पाठराखण... 
अर्जुनसोबतच जान्हवीनेही अंशुलाची पाठराखण केली. ‘फोनवर तिला माझा आवाज नीट ऐकू येत नव्हता. शो संपल्यानंतर तिने मला फोन करण्यामागचं कारण विचारलं,’ असं स्पष्टीकरण जान्हवीने दिलं.

बातम्या आणखी आहेत...