आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूर म्हणाला, जान्हवी-खुशीसोबत सर्व काही सुरळीत होण्यास अजून वेळ लागेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन कपूर सध्या आपल्या आगामी 'इंडियाज मोस्ट वाँटेड' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याचबरोबर तो अपकमिंग चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी सध्या त्याच्याकडे वेळ नाही. मात्र, तो आपल्या बहिणीची खूप काळजी घेतो. कुणी त्यांच्यावर काही टीका केली तर तो लगेच त्यांना फटकारतो. हे नेटकऱ्यांना चांगलेच माहीत आहे. नुकतेच त्याने सांगितले की, श्रीदेवींचे निधन झाल्यानंतर तो बहिणी जान्हवी आणि खुशीकडे गेला. 


याविषयी अर्जुन म्हणाला, जे झाले ते फारच वाईट झाले. त्यामुळे मला आणि अंशुलाला जान्हवी आणि खुशीच्या जीवनात यावे लागले. नाही तर आम्ही कधीच एकत्र आलो नसतो. त्यांची आई वारली, अशा दु:खाच्या घडीत कुणीही त्यांच्याजवळ गेले असते. आम्ही तर घरातलेच आहोत. सध्या त्यांना प्रेमाची गरज आहे. आम्ही मोठे आहोत. त्यामुळे त्यांच्या दुखात आम्हीदेखील सहभागी झालो. त्यांची आई जिवंत असती तर आम्हाला कधी त्यांच्या घरी जाण्याचीही गरज पडली नसती. आम्ही आपापल्या जगात खुश होतो. त्या त्यांचे आयुष्य चांगले जगत होत्या. आम्हीदेखील आमचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत होतो. मात्र, अचानक आयुष्यात असे घडले की आम्ही सर्व एकत्र आलो. 


अर्जुनने पुढे सांगितले, परिस्थितीच अशी होती, तेव्हा वडिलांसोबत उभे राहायचे होते. अशा वेळी दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर तुम्ही पूर्ण नकार देऊ शकता किंवा सोबत चालू शकता. खरं तर, स्थिती अजूनही सुरळीत झालेली नाही. खरं तर, या घटनेला फक्त सात-आठ महिनेच झाले आहेत. मला आणि अंशुलाला आणखी वेळ लागेल. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सोबत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...