मध्यस्थी करणाऱ्या देशमुखांचे / मध्यस्थी करणाऱ्या देशमुखांचे त्यांच्याच जिल्ह्यात त्रांगडे; मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊनही सोलापूरच्या पालकमंत्र्यांशी जमवूनच घेतले नाही

श्रीनिवास दासरी

Mar 07,2019 10:16:00 AM IST

औरंगाबाद - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख सोमवारी मुख्यमंत्र्यांचे दूत बनून जालन्यात आले होते. परंतु त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी असलेल्या वादाचे त्रांगडे कायम आहे.


सुभाष देशमुख नेहमीच बनतात मुख्यमंत्र्यांचे दूत
नागपूरच्या दोन गटांपैकी सहकारमंत्री देशमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गटाचे मानले जातात. मंत्रिमंडळात त्यांचा उशिरा प्रवेश झाला तरी कॅबिनेट दर्जा मिळाला, तो केवळ गडकरींमुळे. मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा नेहमीच राजकीय सोयीसाठी वापर करताना दिसतात. मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चात देशमुखच मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून आले होते. त्यांच्याकडून यशस्वी शिष्टाई झाली. त्यानंतर लाल झेंडा घेऊन नाशिकमधून निघालेल्या शेतकऱ्यांचा लाँगमार्चही देशमुखांनीच थोपवला होता. शिष्टाई करताना त्यांचे एक वाक्य ठरलेले असते- 'मुख्यमंत्र्यांनी या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन.' दानवे अाणि खोतकरांच्या मध्यस्थीत हे वाक्य नक्कीच आलेले असणार. पण, त्यांनी माध्यमांना झालेल्या चर्चेचा तपशील सांगण्यास नकार दिला.


त्यांनी माझे ऐकून घेतले, बाकी काही झालेले नाही
देशमुख एक मध्यस्थ म्हणून आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवले म्हणून मला दानवेंकडून झालेला त्रास कथन केला. त्यांनी ऐकून घेतले. त्याचा वृत्तांत मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे म्हणाले. मीदेखील उद्धव ठाकरे यांची भेट घेऊनच पुढील भूमिका घेईन. - अर्जुन खोतकर, वस्त्राेद्योग राज्यमंत्री

X
COMMENT