Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Arjun Khotkar announces he is not contesting lok sabha from jalna amid danve feud

Lok Sabha 2019: जालन्यातून दानवेच! भाजप-शिवसेना मेळाव्यात अर्जुन खोतकर यांची माघार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 06:22 PM IST

युतीनंतर ही जागा भाजपकडे गेली

  • Arjun Khotkar announces he is not contesting lok sabha from jalna amid danve feud

    औरंगाबाद - भाजप आणि शिवसेना युतीनंतरही जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी ठेवणारे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी माघार घेतली आहे. त्यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे, जालना लोकसभा सीटची उमेदावारी आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. परंतु, औरंगाबाद येथे रविवारी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात खोतकर यांनी माघारीचा निर्णय घेतला. दरम्यान, पक्षाने यानंतर दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडेन असे खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.


    जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध मैदानात उतरण्याचा निर्धार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला. तसे प्रयत्नही त्यांनी सुरू केले. मात्र, शनिवारी खोतकरांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर हा मतदारसंघ दानवे यांच्याकडेच सोपवण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार, मातोश्रीवर झालेल्या या भेटीच्या वेळी मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. उद्धव यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर खोतकर यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला होता. युतीनंतर ही जागा भाजपकडे गेली.

    एनडीएमध्ये सामील झालेल्या शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपबरोबर युती केली असली तरी गोव्यात मात्र स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. गोव्यात जितेश कामत (उत्तर गोवा) आणि राखी नाईक (दक्षिण गोवा) असे दोन उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहेत. या दोन्ही जागांवर भाजपचे खासदार आहेत. गोवा सुरक्षा मंचाबरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी सांगितले.

  • Arjun Khotkar announces he is not contesting lok sabha from jalna amid danve feud
  • Arjun Khotkar announces he is not contesting lok sabha from jalna amid danve feud
  • Arjun Khotkar announces he is not contesting lok sabha from jalna amid danve feud

Trending