आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड गॅब्रिएला देमेद्रिएद्स यांचा हा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अर्जुनने गॅब्रिएलासोबत गुपचूप विवाह केला अशी चर्चा या फोटोमुळे उडाली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी अर्जुन रामपालने जेसियासोबत विवाह केला होता. दोघे विभक्त झाले असून अर्जुनला दोन मुली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा अभिनेता मॉडेल गॅब्रिएला हिला डेट करत आहे. अशात अर्जुन खरंच लग्न केले की काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. अखेर अॅक्टरनेच हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले. फोटोला कॅपशन देत "एका लग्नात पण, माझ्या नाही!!! अभिनंदन!" असे त्याने लिहिले. या पोस्टनंतरही यूजर्सने त्याला ट्रोल करणे सोडले नाही.
अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांची भेट आयपीएलमध्ये झाली होती. त्यावेळी अर्जुन विवाहित होता. दरम्यानच्या काळात दोघांच्या भेटी बंद झाल्या आणि मेहरने अर्जुनला घटस्फोट दिल्याचे समोर आले. घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुनने पुन्हा गॅब्रिएलास डेट करण्यास सुरुवात केली. 20 वर्षे एकत्रित राहिलेल्या अर्जुन आणि मेहर यांना माहिका (16) आणि मायरा (13) अशा दोन मुली आहेत. या दोघीही अर्जुनसोबतच राहतात. गॅब्रिएला एक मॉडेल आणि अभिनेत्री सुद्धा आहे. ती 2016 मध्ये आलेल्या सोनाली केबल या हिंदी आणि ऊपरी या तेलुगू चित्रपटांमध्ये झळकली आहे. विशेष म्हणजे, घटस्फोटापूर्वी अर्जुन रामपालचे नाव हृतिक रोशनची पत्नी सुजान खानसोबत सुद्धा जोडले जात होते. अर्जुन रामपालचा घटस्फोट झाला त्याच दरम्यान हृतिक आणि सुजान यांनीही घटस्फोट घेतले. परंतु, दोघांनीही एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त धुडकावून लावले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.