आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Rampal And Mehr Jessia Granted Divorce After 21 Years Of Marriage, Both Daughters Stay With Mother

लग्नाच्या 21 वर्षांनी  अर्जुन रामपाल-मेहर जेसिया यांचा काडीमोड, आईसोबत राहणार दोन्ही मुली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिका यांनी 21 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला असून आता कायदेशीररित्या दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये अर्जुन आणि मेहरने घटस्फोटाचा अर्ज केला होता. आता न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला आहे. रिपोर्ट्सनुसार, कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शैलजा सावंत यांनी विशेष विवाह कायद्याअंतर्गत अर्जुन आणि मेहरच्या घटस्फोटाचा अर्ज मंजुर केला आहे. कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अर्जुनच्या दोन्ही मुलींचा (मायरा आणि माहिका) ताबा आई मेहरकडे राहणार आहे.

न्यायालयाच्या अधिका-याने सांगितली घटस्फोटाची प्रक्रिया.. 
न्यायालयाच्या एका अधिका-याने सांगितले, "जर परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला गेला असेल, तर त्याची आधी चौकशी होते आणि नंतर नोंदणी केली जाते. घटस्फोट घेण्यास इच्छुक असलेल्या दाम्पत्याला मॅरेज काउंसलरकडे पाठवले जाते. तिथे जर त्यांच्यात समेट घडून आला नाही, तर त्यांना सहा महिन्यांचा अधिकचा वेळ दिला जातो. जर याकाळात दोघे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि घटस्फोटाच्या अटींवर त्यांचे एकमत राहिले, तर न्यायालयाकडून त्यांचा अर्ज मंजुर केला जातो."

मे 2018 मध्ये वेगळे झाले होते अर्जुन-मेहर 
मे 2018 मध्ये अर्जुन आणि मेहर यांनी विभक्त होणार असल्याची घोषणा केली होती.  दोघे म्हणाले होते, ‘सहजीवनाच्या 20 वर्षांच्या सुंदर प्रवासानंतर आता आमचे मार्ग वेगळे झाले आहे. आता आम्ही वेगवेगळ्या मार्गाने जायचे ठरवले आहे. पण आम्ही एकमेकांसोबत कायम राहू, एकमेकांच्या मदतीला नेहमीच धावून येऊ.’ अर्जुन आणि मेहेर यांना दोन मुली आहेत त्यामुळे या दोघींसाठी आम्ही नेहमीच एकत्र असू पण त्याचवेळी आम्ही एकमेकांच्या खासगी आयुष्यात डोकावणार नाही, याचीही पुरेपुर काळजी घेऊ असेही या दोघांनी म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...