Good News : लग्नाआधी प्रेग्नन्ट झाली गर्लफ्रेंड गॅब्रिएला, अर्जुन रामपालने शेयर केली प्रेगनन्सीची बातमी 

सेक्सीएस्ट महिलांमधील एक मानली जाते गॅब्रिएला...  
 

दिव्य मराठी

Apr 24,2019 04:50:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा वडिल होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने साउथ अफ्रीकी मॉडल गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबतचे आपले नाते ऑफिशियल केले होते आणि तेव्हाच त्याने गॅब्रिएलाची प्रेग्नन्सी इंस्टाग्रामवर अनाउंस केली होती. त्याने गर्लफ्रेंडसोबत एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये गॅब्रिएलाचे बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये अर्जुनने लिहिले, 'थँक्यू बेबी फॉर दिस बेबी.'

मागच्या वर्षीच घेतला अर्जुनने घटस्फोट...
या फोटोवर त्याच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी त्याला शुभेच्छा दिल्या. अर्जुनने पत्नी मेहर जेसियापासून मागच्यावर्षी मेमध्ये घटस्फोट घेतला होता. मेहरसोबत लग्नाच्या 20 वर्षांनंतर त्याने घटस्फोट घेतला होता. त्याच्या आणि मेहरच्या 2 मुली आहेत. घटस्फ़ोटानंतर काही दिवसांनीच तो गॅब्रिएलाला डेट करू लागला. सध्या अर्जुन आणि गॅब्रिएलाने लग्नाबद्दल खुलासा केलेला नाही.

सेक्सीएस्ट महिलांमधील एक मानली जाते गॅब्रिएला...
अर्जुन अनेक प्रसंगी गॅब्रिएलासोबत दिसला आहे. गॅब्रिएलाला एफएचएमची 100 सर्वात सेक्सीएस्ट महिलांपैकी एक आहे. याव्यतिरिक्त ती मिस आयपीएल बॉलिवूडदेखील होती. ती साउथची फिल्म रेड वाइनच्या एका गाण्यामध्ये दिसली होती. अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो अखेरचे फिल्म डॅडीमध्ये दिसला होता.

X