• Home
  • News
  • Arjun Rampal, Girlfriend Gabriela gave birth to baby boy, arjun became father for the third time

Bollywood / तिसऱ्यांदा पिता बनला अर्जुन रामपाल, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने दिला मुलाला जन्म

जेपी दत्ताची मुलगी निधीने शेअर केली बातमी... 

दिव्य मराठी वेब

Jul 18,2019 03:17:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा पिता बनला आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, गॅब्रिएलाचे सिजेरियन डिलिव्हरी झाली. तिला बुधवारी दवाखान्यात भरती केले होते. अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या पेरेंट्सला देखील हॉस्पिटलमध्ये जाताना पहिले गेले. गॅब्रिएलाचे पेरेंट्स विशेषतः यासाठी साउथ अफ्रीकेहून मुंबईला आले आहेत.

जेपी दत्ताची मुलगी निधीने शेअर केली बातमी...
अर्जुन आणि गॅब्रियला पेरेंट्स बनल्याची बातमी जेपी दत्ताची मुलगी निधी दत्ताने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. तिने लिहिले, मुलाच्या आगमनाबद्दल शुभेच्छा अर्जुन रामपाल. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो.

अर्जुनने एप्रिलमध्ये सांगितली होती गॅब्रिएलाच्या प्रेग्नन्सीची बातमी...
काही महिन्यांपूर्वीच अर्जुनने साउथ अफ्रीकी मॉडल गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबतचे आपले ऑफिशियल केले होते आणि मग एप्रिलमध्ये त्याने गॅब्रिएलाच्या प्रेग्नन्सीची बातमी इंस्टाग्रामवर अनाउंस केली होती. त्याने गर्लफ्रेंडसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये गॅब्रिएलाचे बेबी बंप स्पष्टपणे दिसत होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये अर्जुनने लिहिले होते, 'थैंक्यू बेबी फॉर दिस बेबी.'

X
COMMENT