आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Rampal Posted The Emotional Post And Wrote His New Born Beby's Name, 'meet Our Son Arik Rampal'

अर्जुन रामपालने इमोशनल पोस्ट करून सांगितले मुलाचे नाव, लिहिले - 'भेटा आमच्या अरिक रामपालला'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अर्जुन रामपाल 18 जुलैला तिसऱ्यांदा पिता बनला आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात मुलाला जन्म दिला. अद्याप कपलने आपल्या मुलाचे धूसरसे फोटोच सोशल मीडियावरण शेअर केले होते. आता रविवारी त्याने कापल्या मुलाच्या नावाची घोषणा इंस्टाग्रामवर केली आहे. स्टार कपलने या नव्या पाहुण्यांचे नाव अरिक रामपाल ठेवले आहे.  

 

फोटो शेअर करून केली नावाची घोषणा... 
अर्जुनने आपल्या इंस्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर करून लिहिले, 'हा इवलासा प्रकाश पाहून आनंदाश्रू डोळ्यातून आले. याच्यासोबत खूप सारे रंग आता आयुष्यात दिसत आहेत. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो आणि देवाचे आभारी आहोत की, आमच्या आयुष्यात हा लहानगा आनंद आला. भेट आमचा मुलगा अरिक रामपाल याला.'

 

अर्जुनची इंस्टापोस्ट... 

 

 

 

गॅब्रिएलाने शेअर केला होता मुलासोबतचा फोटो... 
शनिवारी पहिल्यांदा गॅब्रिएलाने मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने आपला मदरहुड एक्सपीरियंसदेखील शेअर केला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून लिहिले, 'थकलेली आहे, तरीही या क्षणांवर प्रेम आहे.' पोस्टमध्ये गॅब्रिएला मुलाला कडेवर घेऊन उभी आहे. अर्जुन तिसऱ्यांदा पिता बनला आहे. तसेच गॅब्रिएलाचे हे पहिलेच बाळ आहे. पहिली पत्नी मेहर जेसियापासून अर्जुनला दोन मुली आहेत. या स्पेशल मोमेंटला दोन्ही मुली माहिका आणि मायरादेखील पितासोबत दिसल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिची सिजेरियन डिलिव्हरी झाली आहे.