आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहीचा अाज अर्जुन पुरस्काराने गाैरव; स्मृतीची अनुपस्थिती!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एशियन गेम्समधील चॅम्पियन नेमबाज राही सरनाेबतचा अाज मंगळवारी राष्ट्रपती काेविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गाैरव करण्यात येईल. हा पुरस्कार वितरण साेहळा राष्ट्रपती भवनामध्ये अायाेजित करण्यात अाला आहे. 


या साेहळ्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाणि वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानूला क्रीडा क्षेत्रातील सर्वाेच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणार अाहे. याचदरम्यान भारतीय हाॅकी संघाचे माजी प्रशिक्षक लाेबाे यांंच्यासह चाैघांना द्राेणाचार्य पुरस्काराने गाैरवण्यात येईल. या साेहळ्याची पूर्ण तयारी झाली अाहे. 


महाराष्ट्राची युवा क्रिकेटपटू स्मृती मंधाना या साेहळ्याला अनुपस्थित राहील. सांगलीची ही खेळाडू सध्या श्रीलंकेमध्ये टी-२० मालिका खेळत अाहे. त्यामुळे तिला या साेहळ्याला उपस्थित राहता अाले नाही. 

बातम्या आणखी आहेत...