आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun's Girlfriend Gabriella Shared A Photo With The Child, Captioned 'Tired, But Still Loving This Moment'

अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केला मुलासोबतचा फोटो, कॅप्शनमध्ये लिहिले - 'थकलेली आहे, तरीही या क्षणावर खूप प्रेम आहे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने 18 जुलैला मुलाला जन्म दिला. पहिल्यांदा गॅब्रिएलाने मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने आपला मदरहुड एक्सपीरियंसदेखील शेअर केला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून लिहिले, 'थकलेली आहे, तरीही या क्षणांवर प्रेम आहे.' पोस्टमध्ये गॅब्रिएला मुलाला कडेवर घेऊन उभी आहे.  

 

बाळाचे नाव अजूनही आहे गुलदस्त्यात... 
काही दिवसांपूर्वी अर्जुननेदेखील मुलाचा फोटो शेअर केला होता, अर्जुन मुलाला आपल्या हातांमध्ये घेऊन उभा होता. दोन्ही फोटोजमध्ये न्यूबॉर्नचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. तसेच अजूनही कपलने बाळाचे नावही अनाउंस केले नाही. आशा आहे की, अर्जुन लवकरच नावासोबत मुलाचा पूर्ण फोटोदेखील लवकरच शेअर करेल.  

 

तिसऱ्यांदा पिता बनला अर्जुन... 
अर्जुन तिसऱ्यांदा पिता बनला आहे. तसेच गॅब्रिएलाचे हे पहिलेच बाळ आहे. पहिली पत्नी मेहर जेसियापासून अर्जुनला दोन मुली आहेत. या स्पेशल मोमेंटला दोन्ही मुली माहिका आणि मायरादेखील पितासोबत दिसल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिची सिजेरियन डिलिव्हरी झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...