Home | Sports | From The Field | armado kolako choose new indian football team coach

कोलाको भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक

Agency | Update - May 22, 2011, 12:38 PM IST

अर्माडो कोलाको यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • armado kolako choose new indian football team coach

    नवी दिल्ली - गत महिन्यात बॉब हाटन यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर वाऱ्यावर असलेल्या भारतीय फुटबॉल संघाला प्रशिक्षक मिळाला आहे. अर्माडो कोलाको यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    येत्या जुलै महिन्यात दुबईत होणाऱ्या स्पर्धेत अर्माडो यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ खेळणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोलाको यांची चार महिन्यांसाठी प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारताची कामगिरी सुधारण्यासाठी कोलाको यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण राहणार आहे.

Trending