आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सीसीटीव्हीत कैद झाला सशस्त्र बँक दरोडा, दिल्लीत कॅशिअरला ठार मारून लाखोंची लूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तोंडावर मास्क घालून आलेल्या 6 सशस्त्र दरोडेखोरांनी दिल्लीतील एका बँकेच्या कॅशिअरला ठार मारले. दिवसा-ढवळ्या पडलेल्या या दरोड्यात त्यांनी 3 लाख रुपयांची लूट केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या धक्कादायक घटनेचा 90 सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 90 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दरोडेखोर धारदार शस्त्रांसह घुसले. यानंतर गार्डला मारहाण करून त्याची रायफल हिसकावून घेतली. यानंतर थेट कॅशिअरला गोळ्या घालून रोकड लुटला. 

 

#WATCH: CCTV footage of a corporation bank being robbed in Delhi's Khaira yesterday by armed assailants. Cashier was shot dead. Investigation underway. pic.twitter.com/4XSz1JX8AF

— ANI (@ANI) 13 October 2018

ही घटना दक्षिण दिल्लीतील छावडा टाऊनमध्ये असलेल्या एका सहकारी बँकेत घडली आहे. देशाच्या राजधानीत गेल्या 10 वर्षांत बँक दरोड्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या शस्त्रसाठ्यासह बँकेत घुसलेल्या या दरोडेखोरांनी 16 ग्राहक आणि 6 बँक कर्मचाऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून ओलीस ठेवले होते. सुरुवातीला त्यांनी कॅशिअरकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कॅशिअर संतोष यांनी त्याचा विरोध केला. यावर संतप्त चोरट्यांनी त्यांच्यावर गोन गोळ्या झाडल्या. कर्मचाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...