Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | armed robbery at teachers home in chalisgaon jalgaon crime news

चाळीसगावात चड्डी-बनियान गँगची दहशत, शिक्षकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; हजारोंचा ऐवज लंपास, एक जखमी

प्रतिनिधी | Update - Apr 03, 2019, 10:49 AM IST

मध्यरात्री घुसले, 5 तोळे सोने आणि हजारोंचा कॅश घेऊन काढला पळ

  • armed robbery at teachers home in chalisgaon jalgaon crime news

    चाळीसगाव - शहरातील तेजस कोणार्क परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनीत मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री सशस्त्र दरोडा घालण्यात आला. वना शेवरे यांच्या राहत्या घरी सुमारे 5 ते 6 दरोडेखोरांनी हल्ला करून शेवरे यांचा मुलगा मनोजच्या डोक्यावर टॉमीने वार केला. तसेच बचावासाठी आलेल्या इतर कुटुंबियांना देखील मारहाण केली. यानंतर घरातील जवळपास 5 तोळे सोने नाणे आणि ते 20 हजार रुपये रोख असा ऐवज चोरू नेला. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत मनोजला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


    शहरातील वना शेवरे हे शिक्षक कॉलनी परिसरात आपल्या पत्नी, मुलगा मनोज, मुलगी मोनाली, सुन आणि नातवंडांसोबत राहत होते. मध्यरात्रीनंतर सगळेच गाढ झोपेत असताना सशस्त्र दरोडेखोर सुरुवातीला वना यांच्या बेडरुममध्ये घुसले. त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि कुटुंबियांना मारहाण सुरू केली. आरडा-ओरड ऐकून मनोज बेडरुममध्ये आला तेव्हा चोरट्यांनी त्याच्या डोक्यात टॉमीने प्रहार केला. वना शेवरे यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे एकमेकांशी हिंदीत बोलत होते. त्यांनी हाफ पॅन्ट आणि बनियान घातला होता. घरातील दागिने आणि रोख रकमेसह चोरटे 4 स्मार्टफोन सुद्धा घेऊन पसार झाले. यानंतर काही वेळातच चोरट्यांनी मोबाईल फेकल्याचे समोर आले. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत.

Trending