आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गेम ऑफ थ्रोन्स'वर आधारित लढाईमध्ये 29 देशांतील सैनिकांचा सहभाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीव(युक्रेन)- नुकताच 'गेम ऑफ थ्रोन्स' या ऐतिहासिक मालिकेचा शेवट झाला. या मालिकेला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण याच्या चाहत्यांनी आठवण म्हणून एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. येथून 100 किमी अंतरावर असलेल्या कॉपाचिव गावामध्ये एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 29 देशांच्या खेळाडूंनी मध्यकालीन काळातील सैनिकांचा वेश परिधान करून एकमेकांशी युद्ध करण्यासाठी आले होते. 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेवर आधारित लढाई करताना पाहून उपस्थित लोकांना मध्यकातील काळाची आठवण झाली. यावेळी 1 हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच यामध्ये महिलांचाही समावेश होता.  

 

या स्पर्धेसाठी एक मजबुत जागा तयार केली जाते आणि त्यामध्ये वाळू असलेल्या जमीनीवर दोन संघ एकमेकांना टक्कर देतात. हे खेळाडू युद्धातील सैनिकांप्रमाणेच युद्ध करतात.
 

कवचवरच वार करण्याचा नियम
या खेळाचे काही नियम आहेत. सर्व खेळाडू चांगले मजबूत कवच घालून मैदानात येतात. त्यांना शरीराच्या त्याच भागावर वार करता येतो जो भाग कवचने झाकलेला आहे. तसेच कोपरा आणि मानेवर वार केल्यास ते खेळाच्या नियमांविरूद्ध मानले जाते. स्पर्धेत खेळाडू खाली पडल्यावर त्याला बाद घोषित केले जाते. 

 

यावेळेस इंटरनॅशनल मेडिव्हल कॉम्बेट फेडरेशनने चार दिवसांचा वर्ल्ड कप यूक्रेनची राजधानी कीवमध्ये आयोजित केला होता. यापूर्वी ही स्पर्धा स्कॉटलँडमध्ये झाली होती. त्यामुळे आता यूक्रेनने अशा प्रकारच्या खतरनाक खेळाला 2016 मध्ये अधिकृत खेळाचा दर्जा दिला होता.


यूक्रेनमध्ये पहिल्यांदाच स्पर्धा
ज्या प्रमुख देशांनी यामध्ये भाग घेतला होता त्यामध्ये, ब्रिटेन, जर्मनी, चीन, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कॉपिचन गावातील प्राचीन काळच्या राज्यातील प्रतिकृती लाकडापासून तयार करण्यात आली आहे. तसेच युक्रेनमध्ये या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदा करण्यात आले होते.


'वजनदार कवच घालून लढने आव्हानात्मक'
फ्रांस संघाचा कर्णधार क्रिस्टोफर बर्रे यांनी सांगितले की, ही स्पर्धा खूप रोमांचक होती. पण 20 किलोचे कवच घालून लढाई करणे  आव्हानात्मक होते. पोलँडचा एका खेळाडू म्हणाला की, माझ्याकडे असलेल्या कवचचे वजन 27 किलो होते.

बातम्या आणखी आहेत...