आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर प्रमुखपदी निवड झाल्यानंतर शनिवारी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, पाक व्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग आहे असा संसदीय ठराव आहे. संपूर्ण प्रदेश आपल्याला मिळावे अशी संसदेची इच्छा असेल आणि आम्हाला या संदर्भात आदेश मिळाल्यास आम्ही नक्कीच कारवाई करू.
काश्मीर : लष्कराला जनतेचे पूर्ण समर्थन
जनरल नरवणे म्हणाले की, जम्मू-काश्मिरमध्ये प्रत्येकजण चांगले काम करत आहे. आम्हाला जनेतेचे पूर्ण समर्थन आहे. आम्ही स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे आभारी आहेत. त्यांच्या लष्कराविषयी कोणतीही तक्रार नाहीये. सिमेवर तैनात केलेल्या कमांडरच्या निर्णयाचा सन्मान करावा. लष्कराविरोधात नोंदवण्यात आलेल्या सर्व तक्रारी निराधार असल्याचे समोर आले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ: समन्वयासाठी सीडीएस आवश्यक
जनरल नरवणे म्हणाले की, तिन्ही दलांत समन्वय अत्यंत महत्वाचा आहे. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. सैन्य बदलण्याच्या प्रक्रियेत आहे. आम्ही नेहमीच असा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू की आम्हाला सर्वोत्तम मिळेल. आपल्यासमोर कोणतीही आव्हाने आली तरी भविष्यात आपण त्यांच्यासाठी तयार असले पाहिजे. हे आमचे लक्ष आहे.
नरवणे यांनी 31 डिसेंबर रोजी स्वीकारला पदाचा पदभार
माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर लेफ्टनंट जनतेचे नरवणे 31 डिसेंबर रोजी 28 वे लष्कर प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. जनरल बिपिन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस बनले आहेत. यापूर्वी जनरल नरवणे गुरुवाती जगातील सर्वांत उंच युद्धक्षेत्र सियाचिनला गेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.