आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेह : लष्करप्रमुखपदाची सूत्रे घेतल्यानंतर जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र सियाचिन गाठले. तेथे त्यांनी युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. सियाचिनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदके प्रदान केली. याप्रसंगी लष्करप्रमुख म्हणाले, मला पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ येथे येण्याची इच्छा होती. परंतु खराब हवामानामुळे येऊ शकलो नाही. येथे तैनात प्रत्येक जवान अतिशय कठीण व प्रतिकूल परिस्थितीत काम करतो. जवानांना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यांना उपलब्ध व्हावी, अशी व्यवस्था करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तुम्हाला चांगले कपडे, अन्नधान्य दिले जाईल. याप्रसंगी जनरल नरवणे यांच्यासमवेत कमांडर रणबीर सिंह देखील होते. एक अधिकारी म्हणाले, आम्ही सियाचिनमधील सुरक्षा स्थिती व अप्रिय घटनांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर सज्जतेचे निरीक्षण केले. येथे तैनात असलेल्या अधिकाऱ्यांकडून नियंत्रण रेषा व चीन, पाकिस्तानच्या सरहद्दीबद्दलची माहिती घेतली. प्रमुख चौकींचाही दौरा केला. प्रतिकूल परिस्थितीत सैनिकांना आवश्यक वस्तू हेलिकॉप्टरने उपलब्ध करून देण्याची प्रक्रियाही पाहिली. नरवणे शुक्रवारी देखील सियाचिन मुक्कामी अाहेत.
आव्हान : उणे ५० अंश तापमानात ३ हजार सैनिक
हवामान विभागाच्या मते गुरुवारी सियाचिनचे किमान तापमान उणे ३२ अंश होते. येथील तापमान उणे ५० अंशांपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दरड कोसळल्याने ६ सैनिकांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. ३६ वर्षांत येथे १ हजार सैनिक शहीद झाले. तीन चतुर्थांश मृत्यू वाईट हवामानामुळे झाले आहेत. येथे जवळपास ३ हजारावर भारतीय सैनिक तैनात आहेत. सुरक्षेसाठी दररोज ५ कोटी रुपये खर्च होतो.
भूगोल : ध्रुवीय क्षेत्राबाहेरील दुसरे मोठे हिमक्षेत्र
सियाचिन प्रदेश हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगेवर भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ आहे. काराकोरमच्या ५ मोठ्या हिमक्षेत्रातील सर्वात मोठा प्रदेश आहे. ते ध्रुवीय क्षेत्राबाहेर ताजिकिस्तानच्या फेदचेंकोनंतर जगातील सर्वात मोठे हिमक्षेत्र आहे. समुद्र सपाटीपासून त्याची उंची ५ हजार ७५३ मीटर आहे. ते लडाख जिल्ह्यात येते. पाकिस्तानने येथे अनेकवेळा ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले. १९८४ पासून येथे भारतीय सैनिक तैनात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.