आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Army Chiefs Talk Over Protests On Citizenship Law, Saying 'He Is Not A Leader Who Misleading For Violence'

नागरिकत्व कायद्यावर निदर्शनांबाबत लष्करप्रमुखांनी सुनावले, म्हणाले - 'हिंसाचारासाठी लोकांची दिशाभूल करणारा नेता नसतो'

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : देशात नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेले राजकारण व निदर्शनांदरम्यान लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्याने नवे वादंग निर्माण झाले आहे. दिल्लीत गुरुवारी एका कार्यक्रमात रावत यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात देशभरातील हिंसाचारावर भाष्य केले. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांत हिंसाचार व जाळपोळ करणारे नेते असू शकत नाहीत. हिंसाचारासाठी लोकांची दिशाभूल करणारे नेतृत्व करू शकत नाहीत, असे रावत यांनी म्हटले आहे. रावत म्हणाले, विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी हिंसाचारात मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे आपण पाहिले आहे. या गर्दीला नेतृत्व देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, अशा प्रकारे नेतृत्व विकसित होऊ शकत नाही. नेतृत्वासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींची गरज असते. तुम्ही प्रगती करता तेव्हा प्रत्येकजण तुमचे अनुकरण करतो. ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाही. उलट अतिशय कठीण आहे. योग्य दिशेने घेऊन जातो. तोच नेता असू शकतो, असे रावत यांनी ठासून सांगितले.

सियाचीनमधील जवानांचे लष्करप्रमुखांनी केले स्मरण

लष्करप्रमुख म्हणाले, आजकाल आपण दिल्लीत थंडीपासून सुरक्षेसाठी खटाटोप करू लागलो आहोत. मला आपल्या सैनिकांबद्दल सांगायचे आहे. सियाचीन व इतर हिमशिखरांवर उणे १० अंश तसेच ४५ अंशांच्या तापमानातही ते देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत.

भाजपने व्हिडिआे जारी केला : काँग्रेसने आणले होते एनपीआर

भाजपचे आयटी प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट केले. ते म्हणाले, एनपीआर संपुआ सरकारच्या कार्यकाळात आणले गेले. मालवीय यांनी तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांचा व्हिडिआेही ट्विट केला. इतिहासात पहिल्यांदाच १२० कोटी लोकांची आेळख करणे, गणती करणे व आेळखपत्र देण्याचे काम सुरू केले जात आहे.

चिदंबरम यांचे उत्तर, २०१० मध्ये आम्ही एनपीआरमध्ये केवळ नागरिकांबद्दल बोललो होतो, त्यात एनआरसीचा उल्लेख नव्हता. सरकारला घेरण्यासाठी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अनेक ट्विट करून स्पष्टीकरण दिले. भाजपने काँग्रेसच्या एनपीआरसंबंधी २०१० च्या व्हिडिआेला शेअर केल्यानंतर चिदंबरम यांनी पलटवार केला. काँग्रेसने सामान्य नागरिकांचा मुद्दा मांडला होता. त्यात नागरिकत्वाचा उल्लेख नव्हता. २०१० च्या काँग्रेसच्या व्हिडिओला भाजपने शेअर केले. त्याबद्दल मी आनंदी आहे. या व्हिडिआेला काळजीपूर्वक ऐका. आम्ही देशातील सामान्य नागरिकांबद्दल बाेलत होतो. विनाभेदभाव सर्वसामान्य नागरिकांना त्यात समाविष्ट करण्याविषयी आम्ही तेव्हा बोललो होतो. एनपीआर केवळ २०११ च्या शिरगणतीची केवळ सुरुवात होती. त्यात एनआरसीचा कोठेही उल्लेख नव्हता.

आपल्या कार्यालयाची मर्यादा जाणून घेणेही नेतृत्व : ओवेसी

लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टोला लगावला आहे. आपल्या कार्यालयाच्या मर्यादा जाणून घेणे हा देखील नेतृत्वाचाच भाग आहे. नागरिकत्वाला सर्वोच्च स्थानी ठेवणारे व तुम्ही नेतृत्व करत असलेल्या संस्थेची एकसंधता जपतात तेच खरे नेतृत्व असते, असे ओवेसी यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, जनरल साहेब तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. परंतु, आपल्या समर्थकांना सांप्रदायिक हिंसाचारात सहभागी होण्याची परवानगी देतात, तेही नेते नसतात, असे मला वाटते.

बातम्या आणखी आहेत...