आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनी ट्रॅप/ पुलवामा आणि बालाकोट अटॅकनंतरही परदेशी महिलेच्या संपर्कत होता सेनेचा क्लर्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ(मध्यप्रदेश)- सेनेतील गुप्त माहिती परदेशी महिलांकडून लीक केल्याच्या गुन्ह्यात गुरुवारी इंदुरच्या महूमधून ताब्यात घेण्यात आलेल्या अविनाश कुमारबद्दल मध्यप्रदेश एटीएसला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा अटॅक आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अविनाश विदेशी महिलेच्या संपर्कात होता. 


तपास यंत्रणेला संशय आहे की, त्याने व्हिडिओ कॉलिंग करून सेनेची गुप्त माहिती पनी ट्रॅपला दिली आहे. संबंधित महिला स्वतःला राजस्थानची असल्याचे सांगत त्याच्याकडून माहिती घेत होती. मिल्ट्री हेडक्वॉर्टर ऑफ वॉर(महू) मध्ये बॉर्डरवर मिल्ट्रीची प्रत्येक माहिती असते. तपास यंत्रणेचे म्हणने आहे की, या परिसरातील अजून काही लोकांवरदेखील संशय आहे. 


अविनाश कुमारवर एटीएस, सेंट्रल एजंसी आणि मिल्ट्री इंटेलिजेंसची नजर होती. त्याच्यावरील संशय 10 महिन्यांपूर्वी तेव्हा वाढला, जेव्हा त्याच्या बँक खात्यात पहिल्यांदा 10 हजार रूपयांचे ट्राझॅक्शन झाले. ही रक्कम दिल्लीवरून ट्रान्सफर झाली आहे. तपास यंत्रणा आता अविनाश आणि त्याच्या कुटुंबाचे बँक खाते तपासत आहेत.

 

एटीएसने शुक्रवारी दुपारी अविनाशला स्पेशल कोर्टात हजर केले. चौकशी आणि रिकव्हरीचे कारण देत सेनेने त्याची रिमांड मांगितली. कोर्टाने अविनाशला 26 मे पर्यंत रिमांड सांगितली आङे. त्याला आयपीसी कलम 123 अंतर्गत आरोपी बनवण्यात आले आहे. या अंतर्गत त्याला 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.


व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सेनेची गुप्त माहिती लीक
अविनाशच्या चौकशीदरम्यान एटीएसला चॅटिंग आणि इमेज शेअरिंगचे पुरावे मिळाले आहेत. त्यासोबतच हेदेखील समोर आले आहे की, व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तो अनेक महत्त्वाची डॉक्यूमेंट्स त्या परदेशी महिलेला दाखवत होता. सेंट्रल एजंसी, एटीएस आणि मिल्ट्री इंटेलिजंसच्या ज्वाइंट इंटेरोगेशनदरम्यान या बाबी समोर आल्या. त्याचे पकडले जाणे याकरता महत्त्वाचे आहे, कारण त्याला डिस्पॅच, इंट्रारेड आणि सुरक्षा प्रणालीचा अॅक्सेस होता. टीमला त्याच्या घरातून बालाकोटचे डॉक्यूमेंट्स आणि काही इलेक्ट्रोनिक आयटम्स मिळाले आहेत.


एप्रिलमध्ये दानापूरवरून आली होती रेजिमेंट
मुळ बिहारच्या वैशालीचा राहणारा 26 वर्षीय अविनाश फक्त 12वी पास आहे. परीक्षा देऊन तो दहाव्या बिहार रेजिमेंटमध्ये भर्ती झाला होता. आता ही रेजिमेंट दानापूरमध्ये स्थित आहे. एप्रिल 2019 मध्ये या रेजिमेंटला महूला बोलवण्यात आले होते. तो फॅमिलीसोबत आर्मी कँममध्ये राहत होता.

 

दुबईमधून मिळाली होती ऑफर
परदेशी महिला बहुतेक पाकिस्तानची आहे आणि त्याला राजस्थानची असल्याचे सांगत बोलत होती. तिने त्याला आपल्या जाळ्यात फासले होते. महिलेने व्हिडिओ कॉलिंग आणि चॅटिंग करून त्याला दुबईला बोलवले होते, पण त्यापूर्वीच तो पकडला गेला.