आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारत आज 72 वा सैन्य दिन साजरा करत आहे. फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर सेना प्रमुख जनरल मनोज नरवणे म्हणाले की, भारतीय लष्कर ही देशाची मूल्यवान संस्था आहे. या अनुषंगाने दिल्लीतील करियप्पा परेड मैदानावर पथसंचलन होणार आहे. यामध्ये सेनेच्या कॅप्टन तानिया शेरगिल पुरुष बटालियनचे नेतृत्व करतील.
तानियांच्या वडिल, आजोबांनी सैन्यात केली सेवा
तानिया 2017 मध्ये चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकादमीत दाखल झाली होती. तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशमध्ये बी-टेक केले आहे. तिचे वडिल, आजोबा आणि पणजोबांनी भारतीय लष्करात सेवा केली आहे. पुरुषांचे पथसंचलन करणारी ती चौथ्या पीढीची पहिली महिला अधिकारी आहे. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी कॅप्टन भावना कस्तुरीने पुरुष बटालियनचे नेतृत्व केले होते.
सैनिकांच्या गरजा पूर्ण करू
सैन्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांना संबोधित करताना जनरल नरवणे म्हणाले की, भारतीय लष्कर फक्त एक लढाऊ संघटना किंवा राष्ट्रशक्तीचे साधन नाही. याचा देशात विशेष दर्जा आहे. चीन-पाकिस्तान सीमेवर सैनिक आणि काश्मीरमध्ये 'प्रॉक्सी वॉर' लढणार्यांनी सतर्क असले पाहिजे. जवानांच्या सर्व गरजा कोणत्याही किंमतीत पूर्ण केल्या जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.