• Home
  • National
  • Punjab
  • Army jawan Hardeep Singh died in para jump attempt from 8000 feet in Agra, main parachute did not open

ट्रेनिंगदरम्यान जवानाचा मृत्यू; / ट्रेनिंगदरम्यान जवानाचा मृत्यू; 8000 फुटावरून उडी घेतल्यानंतर पॅराशूट न उघडल्याने जमिनीवर आदळला

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जवानाचा मृत्यू झाल्याचा कुटूंबियांचा आरोप.

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 06:13:00 PM IST

आग्रा- पटियाळा जिल्ह्यात 8 हजार फूट उंचीवरून उडी घेतल्यानंतर पॅराशूट न उघडल्याने जवान हरदीप सिंग (वय28) यांचा मृत्यू झाला आहे. 2012 मध्ये लष्करात भरती झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 5 वेळा यशस्वी पॅराजंपिंग केले होते. सध्या ते आसामध्ये तैनात होते. रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास 34 साथीदारांसह ते वायुसेनेच्या एएन-32 विमानात पॅराजंपिंगसाठी गेले होते. मलपुरा ड्रॉपिंग झोन आल्यानंतर सगळ्यांनी 8 हजार फुटांवरून उडी घेतली होती. 6 हजार फुट उंचीवर पोहचल्यानंतर हरदीप यांनी मुख्य पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला. पण हवेचा दबाव जास्त असल्याने त्यांचा तोल बिघडला आणि त्यांचे पॅराशूट अडकले. त्यानंतर त्यांनी दुसरे पॅराशूट उघडले पण त्यात त्यांचा डावा हात अडकला. अनेक प्रयत्न करुनदेखिल तोल सावरण्यास त्यांना कठीण झाले आणि ते शेतात पडले. साथिदारांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले परंतू त्यांचा मृत्यू झाला होता.


निष्काळजीपणाचा आरोप
आग्रा शहराचे एसपी अखिलेश नारायण यांनी हरदीप यांच्या पॅराशूटबद्दल प्रश्न उपस्थित करत विभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. हरदीप यांचे मामा प्रितपाल सिंग यांच्या मते, हरदीप यांचा मृत्यू अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून केंद्र सरकारने या घटनेची तपासणी करावी, असे ते म्हणाले आहेत.

ड्रॉपिंग झोनजवळ शेतात पडले हरदीप सिंग

हरदीप ड्रॉपिंग झोनजवळ शेतात डोक्यावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

8 महिन्यांत दुसरी घटना

मलपुरा ड्रॉपिंग झोनमध्ये 8 महिन्यांत ही दुसरी घटना आहे. 23 मार्चला जवान सुनील कुमार (वय27) पॅराजंपिंग करत असताना पॅराशूट न उघडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

X
COMMENT