आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांनी पेरुन ठेवलेल्या आयईडीच्या स्फोटात पुण्यातील मेजर शशीधरन नायरसह जवान शहीद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ शुक्रवारी दहशतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फाटोत पुण्याचे मेजर शशीधरन नायर (33) आणि पश्चिम बंगालचे जवान जीवन गुरुंग (24) हे शहीद झाले. गेल्या 11 वर्षांपासून ते लष्करात कार्यरत होते.

 

शनिवारी सायंकाळी नायर यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता लष्कराच्या वॉर मेमोरियल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी लष्कराचे आजी-माजी अधिकारी तसेच नागरिकांनी मेजर नायर यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव खडकवासला येथील निवासस्थानी नेण्यात येणार असून रविवारी सकाळी विधिवत कार्यक्रमानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावर सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

मेजर नायर यांचे कुटुंबीय पुण्यातील खडकवासला परिसरात वास्तव्यास आहेत. 30 जुलै 1985 रोजी शशीधरन यांचा जन्म झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये एनसीसीत असल्याने त्यांना लष्कराची विशेष आवड होती. त्यादृष्टीने त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे दाखल होत तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. 2007 मध्ये भारतीय लष्करात ते दाखल झाले. 2011 मध्ये तृप्ती नायर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरून ठेवलेल्या दोन भुसुरुंगाचा स्फोट झाला. त्यानंतरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात नायर आणि गुरुंग शहीद झाले.

बातम्या आणखी आहेत...