आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक: नराधमाने जवानाच्या पत्नीचा शूट केला नग्न व्हिडिओ, मग ब्लॅकमेल करून अनेक वेळा बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार - एका जवानाच्या पत्नीचा रेप करून अश्लील व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना बिहारमधील आहे. येथे एका नराधमाने आधी पीडित विवाहितेचा एक अश्लील व्हिडिओ बनवला आणि मग त्या जोरावर तिला ब्लॅकमेल करून बळजबरी शारीरिक संबंध बनवू लागला.

 

असे आहे प्रकरण...

भोजपुर जिल्ह्याच्या कोईलवर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडितेने जबाबात सांगितले की, एका न्यूड व्हिडिओच्या नावावर आरोपी तिला ब्लॅकमेल केले.

आरोपी महिलेशी बळजबरी लैंगिक संबंध बनवतो आणि पैसेही घेत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी केली जात आहे.

 

ब्लॅकमेल करून अनेकदा बलात्कार
आरोपीने जवानाच्या पत्नीचा न्यूड व्हिडिओ बनवला होता. मग व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक वेळा रेप केला.

यामुळे त्रस्त होऊन जवानाच्या पत्नीने हे सर्व आपल्या पतीला सांगितले. सूत्रांनुसार, आरोपी धनडीहा गावाचा रहिवासी विकास कुमार हा जवानाच्या घरी नेहमी येत-जात होता. यादरम्यानच त्याने एका दिवशी लपून जवानाच्या पत्नीचा न्यूड व्हिडिओ शूट केला.

 

याच प्रकारची घटना मागच्या काही दिवसांपूर्वी आरा शहरातील महिला पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. यात फौजदाराच्या मुलीचा व्हिडिओ बनवून तिला वर्षभरापासून ब्लॅकमेल केले जात होते. यानंतर मुलीने महिला पोलिसांत गुन्हा दाखल केला. अद्यापही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी माहिती...  

 

 

बातम्या आणखी आहेत...