Intarnational Special / हॉलीवूडच्या 'टर्मिनेटर'वर हल्ला; इव्हेंटमध्ये फॅन्सशी बोलत असताना अरनॉल्ड श्वार्जनेगरला तरूणाने मारली लाथ, नंतर पकडल्यावर मागितली दयेची भीक


अरनॉल्डने हा व्हिडिओ शेअर करत हल्लेखोराची खिल्ली उडवली, म्हणाला-'मला असे वाटले की, मागून कोणीतरी धक्का दिला..'

दिव्य मराठी वेब टीम

May 19,2019 01:22:00 PM IST

जोहानेसबर्ग- दक्षिण अफ्रीकेत आपल्या स्पोर्ट्स इव्हेंटचा प्रचार करण्यासाठी गेलेले हॉलीवूड स्टार अरनॉल्ड श्वार्जनेगरवर एका तरूणाने मागून हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, जेव्हा अरनॉल्ड आपल्या फॅन्सशी बोलत आहेत, तेव्हा अचानक एका तरूणाने मागून त्यांना लाथ मारली. पण, या हल्ल्यात बलाढ्य शरिरयष्टीच्या अरनॉल्ड यांना जास्त लागले नाही. हल्ल्यानंतर सेक्योरिटी गार्डने हल्लेखोरोला पकडले.


'असे वाटले मागून कोणतरी धक्का दिला'
अरनॉल्ड यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर आकाउंटवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी मस्करीत लिहीले, "घाबरायचे काहीच कारण नाहीये. मला काहीच झाले नाहीये, मला वाटले कोणीतरी मागून धक्का दिला, गर्दीच्या ठिकाणी होत असते. मला तुमच्याप्रमाणेच व्हिडिओ पाहूनच कळाले की, कोणीतरी मागून मला लाथ मारली आहे."


दुसरे ट्वीट करून त्यांनी लिहीले, "जर तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा असेल, तर हल्लेखोर काय म्हणत आहे ते कट करून शेअर करा, म्हणजे त्याचा प्रयार होणार नाही. आता तुम्हीच मला सांगा मी काय करायला हवे होते? त्याला मारायला हवे होते का नव्हते?"


दक्षिण अफ्रीकेत दरवर्षीय अरनॉल्ड यांच्या नावे होत असतात इव्हेंट्स
इव्हेंट ऑर्गनाइजर्सने सांगित्यानुसार, घटनेनंतर हल्लेखोराला पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. अरनॉल्डने आपल्या फॅन्सना अपील केली आहे की, त्यांनी या घटनेला विसरून आपले लक्ष इव्हेंटवर ठेवावे. दक्षिण अफ्रीकेत दरवर्षी मे महिन्यात अरनॉल्ड यांच्या नावाने 'अरनॉल्ड क्लासिक अफ्रीका इव्हेंट' भरवला जातो. यात बॉडी बिल्डिंगसहित इतर कॉम्बॅट स्पोर्ट्सचे आयोजन केले जाते.

X
COMMENT