Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Healthy Yoga : Start the day of Suryanmaska, this is the scientific method

आरोग्यदायी योग : सूर्यनमस्काराने करा दिवसाची सुरुवात, अशी आहे शास्त्रशुद्ध पद्धत

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 20, 2019, 04:56 PM IST

घरबसल्या योग प्रशिक्षण घेता यावे यासाठी divyamarathi.com व्हिडिओच्या माध्यमातून काही खास आसने दाखवणार आहे

  • Healthy Yoga : Start the day of Suryanmaska, this is the scientific method

    जगभरामध्ये गुरुवारी चौथा जागतिक योग दिन साजरा करण्यात येत आहे. मानवी आरोग्यासाठी योग लाभदायी असल्याचे जगभराने मान्य केले आहे. अनेक आजारांवर योगा लाभदायी आहे हे आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केले आहे. त्यातही सूर्यनमस्कार हा योगातील सर्वांग सुंदर व्यायाम समजला जातो. सूर्यनमस्काराने संपूर्ण शरिराचा आणि सोबतच श्वासाचा व्यायामही एकाचवेळी होतो. तुमच्याकडे जर अत्यंत कमी वेळ असेल तर सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम समजला जातो.

    divyamarathi.com च्या वतीने वाचकांसाठी आम्ही घरबसल्या योग प्रशिक्षण घेता यावे यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून काही खास आसने दाखवणार आहोत. हे व्हिडिओ पाहून वाचकांना घरबसल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने योगा करता येईल. औरंगाबाद येथील प्रसिद्ध योगशिक्षक गजानन सराफ हे या माध्यमातून सर्व वाचकांना योगाचे धडे देणार आहेत.

    चला तर मग सुरुवात करुयात सूर्यनमस्कार

  • Healthy Yoga : Start the day of Suryanmaska, this is the scientific method
  • Healthy Yoga : Start the day of Suryanmaska, this is the scientific method

Trending