Home | Maharashtra | Vidarva | Akola | Around 13 lakhs of cloth bags will be sold in the year

वर्षभरात सुमारे १३ लाख कापडी पिशव्यांची विक्री हाेण्याचा अंदाज

प्रतिनिधी | Update - Aug 04, 2018, 11:18 AM IST

कापडी पिशव्यांच्या खरेदी-विक्रीसह समाजाच्या विशेषत: महिलांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या 'वावर'ला

 • Around 13 lakhs of cloth bags will be sold in the year

  अकोला- कापडी पिशव्यांच्या खरेदी-विक्रीसह समाजाच्या विशेषत: महिलांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या 'वावर'ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत अाहे. या उपक्रमातून दरवर्षी १३ लाख पिशव्यांची खरेदी-विक्री केली जाईल, असा अंदाज आज, शुक्रवारी नोंदवण्यात आला.


  प्लास्टिक बंदीनंतर ओढवलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पर्याय असलेल्या कापडी पिशव्यांचा वापर आणि खरेदी-विक्रीबाबत शुक्रवारी नियोजन भवनात सभा घेण्यात आली. यावेळी हा अंदाज नोंदवण्यात आला. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या उपक्रमाच्या शुभारंभाला आमदार हरिष पिंपळे, स्वत: जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, या उपक्रमासाठीचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, एसडीओ संजय खडसे, उपजिल्हाधिकारी दावभट, पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, राहुल तायडे, रवि काळे व राजेंद्र इंगळे, माविमच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, जिल्हा कचेरीच्या अधीक्षक हर्षदा काकडे, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, शिवतेज प्रतिष्ठानचे इंगळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.


  कापडी पिशव्यांचा वापर कसा पर्यावरणपूरक आहे, याची मांडणी झाल्यानंतर या पिशव्यांचे उत्पादन व मागणी या दोन्ही बाबींची नोंद घेण्यात आली. पिशव्या तयार करण्यासाठी यापूर्वीच आवाहन करण्यात आले असल्याने काही महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणात पिशव्या शिवून आणल्या होत्या. त्याची विक्रीही यावेळी करण्यात आली.


  यावेळी पुढे आलेल्या मागणीनुसार हॉटेल व्यावसायिक दरमहा १ लाख याप्रमाणे वर्षाला १२ लाख पिशव्या खरेदी करणार आहे. याशिवाय दोन्ही शिक्षणाधिकारी कार्यालये प्रत्येकी दहा हजाराप्रमाणे २० हजार, रास्त भाव दुकानदार संघ २० हजार, एचडीएफसी बँक २५ हजार, एनएसएस समन्वयक अडीच हजार, पातूर नगरपालिका १ हजार, शिवतेज प्रतिष्ठान १ हजार आणि इतर वैयक्तिक मागणीकर्ते यांनी त्यांची मागणी नोंदवली. त्यानुसार वर्षाला किमान १३ हजार कापडी पिशव्या विकल्या जाणार आहेत.


  प्रारंभी माविमच्या वर्षा खोब्रागडे यांनी कापडी पिशव्यांच्या फायद्यांबाबत मांडणी केली. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी हे करु नका, ते करु नका... असे सांगण्याची सवय जडलेल्या वर्तमानात आम्ही हे करा, हे सांगू शकलो, याचे मला मोठे समाधान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, प्लास्टिकबंदीची आपत्ती एका अर्थाने महिला बचतगटांसाठी इष्टापत्ती ठरली आहे. या निर्णयामुळे त्यांना रोजगाराची मोठी संधी प्राप्त झाली.


  संचालन शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी प्रफुल्ल लक्रस, प्रमोद घोगरे, प्रवीण ढाकरगे, पंकज दुबे व िहतेश राऊत, खनिकर्म विभागाचे राहुल राठोड यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी हॉटेल असोसिएशनचे योगेश अग्रवाल, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण लवटे, माझोडच्या सरपंच ज्योत्सना खंडारे, मानव साधन केंद्र पातुरच्या उज्ज्वला सुरवाडे, रास्त भाव दुकानदार संघटनेचे शत्रुघ्न मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


  अख्खे सभागृह झाले हाेत लोकमय : या सभेला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील सक्रिय महिला बचत गटांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्या, तेथील निवडक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, सीओ आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांची संख्या प्रचंड असल्याने अख्खे सभागृह नागरिकांनी भरले होते. बाहेरही लोकांची गर्दी जमली होती.


  रोपे सांभाळण्यासाठी घेणार २ लाख पिशव्या
  जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी रोपे सांभाळण्यासाठीच्या १ लाख पिशव्यांची मागणी नोंदवली. त्याचवेळी आमदार पिंपळे यांनीही १ लाख पिशव्या हव्या असल्याचे सांगितले. त्यामुळे रोपे सांभाळण्यासाठीच्या लहान पिशव्या तयार करण्याचे कामही काही महिला बचत गटांना चालून आले आहे.

Trending