आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arpita Khan Sharma Gave Christmas Bash, Salman And Many Celebs Attended The Party

अर्पिता खान शर्माच्या ख्रिसमस बॅशमध्ये सलमानसह पोहोचले अनेक सेलेब्रिटी, चिमुकल्या तैमूूरने वेधले लक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, तैमूर अली खान, आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा. - Divya Marathi
सलमान खान, तैमूर अली खान, आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा.

बॉलिवूड डेस्कः ख्रिसमसच्या निमित्ताने अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी मुंबईत त्यांच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते.  करण जोहर, रितेश देशमुख, तुषार कपूर, निखिल द्विवेदी, सोहेल खान, सलमान खान, सलीम खान, अरबाज खान,  तुषार कपूर, एकता कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रेटी पार्टीत सहभागी झाले होते. तुषार मुलगा लक्ष्य कपूर आणि करण जोहर हा त्याची मुले यश आणि रुही बरोबर दिसला. विशेष म्हणजे तैमूर अली खानदेखील या पार्टीत पोहोचला. पण त्याचे वडील सैफ अली खान आणि आई करीना कपूर खान इथे हजर नव्हते.

प्रेग्नेंट आहे अर्पिता
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा दुस-यांदा आई होणार आहे. सलमानच्या 54 व्या वाढदिवशी  म्हणजे 27 डिसेंबरला अर्पिता तिच्या बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा आहे. 8 नोव्हेंबर 2014 रोजी, हैदराबादच्या हॉटेल फाल्कनुमा पॅलेसमध्ये अर्पिताने आयुषशी लग्नगाठ बांधली. मार्च 2016 मध्ये त्यांचा मुलगा अहिलचा जन्म झाला. विशेष म्हणजे आयुष हिमाचल प्रदेशातील राजकारणी अनिल शर्मा यांचा मुलगा आणि सुखराम शर्मा यांचा नातू आहे. 2018 मध्ये त्याने 'लवयात्री' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

बातम्या आणखी आहेत...