आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे अर्पिता, धाकट्या बहिणीवर जीव ओवाळतो सलमान खान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता सलमान खानचा 54 वा वाढदिवस त्याची धाकटी बहीण अर्पिताने आणखीनच खास बनवला आहे. वाढदिवशी सलमान पुन्हा एकदा मामा झाला आहे. 27 डिसेंबर रोजी सी-सेक्शन डिलिव्हरीद्वारे अर्पिताने तिच्या दुसर्‍या बाळाला जन्म दिला आहे. ती एका गोंडस मुलीची आई बनली आहे. सलमानसह संपूर्ण खान कुटुंब खूप आनंदित आहे. अर्पिताबद्दल बोलायचे झाले, तर ती सलीम खान यांची दत्तक मुलगी आहे. संपूर्ण कुटुंब तिला जीवापाड जपतात. विशेषत: अर्पिता सलमानच्या अगदी जवळची आहे.

हेलन-सलीम यांनी घेतले होते दत्तक : 1981 मध्ये सलीम खान यांनी हेलनबरोबर दुसरे लग्न केले. त्यांना स्वतःचे मूल झाले नाही, त्यानंतर दोघांनीही मूल दत्तक घेण्याचा विचार केला आणि अशा प्रकारे अर्पिता खान कुटुंबात आली. सली खान यांच्या मुलांत सलमान खान थोरला आहे, त्यानंतर अरबाज खान, सोहेल खान, अलविरा अग्निहोत्री आहे. तर अर्पिता सर्वात धाकटी आहे. 

फॅशन मार्केटिंग मध्ये पदवीधर : लाइट-कॅमेर्‍यापासून दूर असलेल्या अर्पिताने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. तिने मुंबईत आर्किटेक्ट म्हणून इंटिरियर डिझायनिंग फर्ममध्ये काम केले आहे.

भविष्यात चित्रपटाची निर्मिती करायची आहे : अर्पिता चित्रपटांपासून दूर आहे, पण भविष्यात चित्रपट निर्मितीतही तिला हात आजमावयाचा आहे. याशिवाय तिला स्वत: चा फॅशन ब्रँडही लाँच करायचा आहे.

आयुष शर्माशी लग्न : अर्पिताचे 18 नोव्हेंबर 2014 रोजी हैदराबादमधील हॉटेल फाल्कनुमा पॅलेसमध्ये आयुष शर्माबरोबर लग्न झाले. मार्च 2016 मध्ये त्यांचा मुलगा आहिलचा जन्म झाला. विशेष म्हणजे आयुष हिमाचल प्रदेशातील राजकारणी अनिल शर्मा यांचा मुलगा आणि सुखराम शर्मा यांचा नातू आहे. 2018 मध्ये त्याने 'लवयात्री' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अर्पिताने अर्जुन कपूरलाही डेट केले होते.

बातम्या आणखी आहेत...