आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arpita Shared Picture Of Daughter With Salman, Wrote 'Brother You Are Always With Me And Aayat Will Get The Same Protection'

अर्पिताने भाऊ सलमानसोबतचा मुलीचा फोटो शेअर करत लिहिले, 'तुम्ही नेहमी माझ्यामागे उभे राहिलात, आता आयतलासुद्धा हीच सुरक्षा मिळेल'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः सलमान खानची बहीण अर्पिता खानने 27 डिसेंबर रोजी आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. या दिवशी सलमान खानचादेखील वाढदिवस होता. अर्पिताचे वडील सलीम खान यांनी या मुलीचे नाव आयत ठेवले होते. स्वत: सलमानने आपल्या ट्विटर अकाउंटवर याच नावाची घोषणा केली होती. मुलीच्या जन्माच्या 18 दिवसानंतर आता अर्पिताने रुग्णालयातून सलमान आणि आई सलमा खान यांच्यासोबतचा आयतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पत्राद्वारे शेअर केले आहे. फोटोमध्ये सलमानने आपल्या भाचीला हातात घेतले असून तिला न्याहाळत आहे. मागे त्याची आई हसताना दिसत आहे.


हा फोटो शेअर करत अर्पिताने लिहिले, या जगात मला कोणत्याच गोष्टीपासून भीती वाटत नाही, मला माहीत आहे, तुम्ही माझ्यासोबत उभे आहात, मला काहीच होऊ देणार नाहीत. आता आयतलादेखील हीच सुरक्षा मिळेल. देवाने तुम्हाला पाठवले आहे. नेहमी तुमची आभारी राहील..सलमान खान आणि मां सलमा खान.'

आगामी चित्रपट

सलमान सलमान खानने नुकतेच आपल्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली'ची घोषणा केली. या चित्रपटाची कथा साजिद नाडियाडवाला यांनी लिहिली आहे. तेच याची निर्मितीदेखील करणार आहेत. 2021 मध्ये ईदला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा प्लॉट समोर आला आहे. सूत्रानुसार, याची कथा देशात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर आधारित आहे.

हिंदू-मुस्लिम एकतेचा मुद्दा

या चित्रपटातून निर्माते शांतता आणि सद्भावनेचा संदेश देणार आहेत. यातून हिंदू-मुस्लिम एकतेचा मुद्दादेखील मांडण्यात येईल. यातील काही भाग यश चोप्राचा 'धर्मपुत्र' अाणि 'धुल का फूल' सारख्या कथेवर देखील आधारित असेल. यातील एक कुटुुंब ईद आणि दिवाळी दोन्ही साजरे करते, यातून त्यांचा चढ-उतारही दाखवण्यात येईल.