आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कुचे यांच्यासह ४४ जणांना अटक व सुटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : परवानगी न घेताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी आमदार नारायण कुचे यांच्यासह ४४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास पाचोड नाका परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या सर्वांना अटक केली. सायंकाळी उशिरा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अंबड शहरातील पाचोड नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. गेल्या सहा महिन्यांपासून येथे चौथरा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास आमदार नारायण कुचे, त्यांचे बंधू देविदास कुचे, अंबादास अंभोरे, दीपकसिंग ठाकूर, संतोष जेधे, बाबासाहेब इंगळे, संदीप आंधळे, सौरभ कुलकर्णी संदीप साहेबराव खरात, सय्यद अनिस सय्यद युनूस, मतीन पठाण यांच्यासह जवळपास ४० ते ४५ लोकांनी क्रेनद्वारे पुतळा बसवण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केले. मात्र आमदार कुचे यांनी पोलिसांचे न ऐकता काम सुरू ठेवले. दरम्यान, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगण आदी येथे दाखल झाले, परंतु तोपर्यंत पुतळा चौथऱ्यावर बसवण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी आमदार कुचे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कुचे यांनी पोलिसांचे न ऐकता वाहनावर डोके आपटण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पोलिसांनी त्यांना पकडले, मात्र तेथे उपस्थित असलेल्या जमावाने घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी सर्व ४४ लोकांना ताब्यात घेतले. तोपर्यंत ज्या आयशर टेम्पोमधून पुतळा आणला होता तो टेम्पो व पुतळा बसवण्यासाठी वापरण्यात आलेल्या क्रेनचालकांना पळवून नेले. दरम्यान, पोलिसांनी आमदार कुचे यांच्यासह ४४ लोकांना अटक करून त्यांना अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान,कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पाचोड नाका परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

बातम्या आणखी आहेत...