आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांची नजरकैद १७ पर्यंत वाढवली, पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात बुधवारी सुप्रीम कोर्टामध्ये ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या नजरकैदेचा कालावधी वाढवण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला होईल. याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी दुसऱ्या कोर्टात व्यग्र असल्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगण्यात आले. 


याआधीही सिंघवी यांनी कोर्टातील सुनावणी दुपारनंतर घेण्यासाठी विनंती केली होती. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी  सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा, वरनॉन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांना वेगवेगळ्या शहरांतून अटक केली होती. याविरुद्ध इतिहासकार रोमिला थापर आणि इतर चार जणांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...