आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arrest Warrant Against Drunk Local Congress Leader Who Tried To Break Into Girls Hostel In Jharkhand

रात्री दीड वाजता गर्ल्स हॉस्टेलमध्ये पोहोचला काँग्रेसचा नेता; तरुणीच्या खोलीजवळ जाऊन दाखवले पैसे, म्हणाला दार उघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद - येथील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणीने स्थानिक काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. तरुणी महाविद्यालयत बीए द्वीतीय वर्षात शिकत आहे. तसेच ती मनोरम नगर येथे काँग्रेस नेत्याच्या पत्नीकडून चालणाऱ्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहते. रात्री उशीरा या नेत्याने तिच्या खोलीवर येऊन अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. तिने वेळीच विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलावल्यानंतर संबंधित नेता पसार झाला. यानंतर तरुणीने पहाटेच्या सुमारास पोलिसांत तक्रार दाखल केली.


विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी नेत्याला पकडण्यासाठी ठिक-ठिकाणी छापेमारी केली. परंतु, आरोपीचा कुठेही पत्ता लागला नाही. आरोपी नेता मनोज सिंह काँग्रेसचा धनबाद जिल्हा उपाध्यक्ष होता. परंतु, तक्रार समोर येताच काँग्रेसने त्याची हकालपट्टी केली. सोबतच, पक्षाने यासंदर्भात पाठपुरावा घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती देखील नेमली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.


रात्री दीड वाजता केला खोलीत घुसण्याचा प्रयत्न
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, हॉस्टेलच्या रुममध्ये झोपलेले असताना 20 आणि 21 मार्चच्या मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. आरोपी मनोज रात्री उशीरा सुमारे दीडच्या सुमारास तिच्या खोलीजवळ आला. सुरुवातीला त्याने दार वाजवले. की-होलमधून पाहिले असता मनोज बाहेर थांबला होता. त्याने यानंतर तरुणीला रोख रक्कम दाखवली आणि दार उघडण्यास सांगितले. यावरून प्रचंड घाबरलेल्या तरुणीने आरडा-ओरड करून हॉस्टेलमधील सर्वांना बोलावले. यानंतर हॉस्टेलच्या इतर सदस्यांसह मनोजची मुलगी सुद्धा बाहेर आली. तिने संपूर्ण घटना सांगितली आणि वेळीच दुसऱ्या खोलीत जाऊन लपली. जमाव वाढत असल्याचे पाहून आरोपी मनोज सिंह तेथून पसार झाला.

बातम्या आणखी आहेत...