आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arrest Warrant Issued Against Solapur MLA Praniti Shinde For Obstructing Government Work

प्रणिती शिंदे अडचणीत, सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे अटक वॉरंट जारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे अडचणी सापडल्या आहेत. जिल्हा न्यायालयात तारखेला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून पोलिस कर्मचाऱ्याला जखमी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरमध्ये 2 जानेवारी 2018 ला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील महागलेल्या वैद्यकीय उपचारासंदर्भात दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत हुज्जत घातली. या धक्काबुक्कीत पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी आमदार प्रणिती शिंदे आणि गुन्हे दाखल झालेल्या इतर जणांविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोप सादर केले. या प्रकरणाची तारीख सोलापूर जिल्हा न्यायालयात होती. न्यायालयाने दिलेल्या तारखेला आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे हे हजर राहिले नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढले, तर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...