Home | National | Rajasthan | Arrested Fetal Gender Investigation Gangster reason of crime is shocking

स्वतःचे लग्न जमेना म्हणून कोणालाही मुलगी मिळू नये यासाठी उचलले एवढे गंभीर पाऊल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 21, 2018, 12:00 AM IST

भविष्यात कोणालाही लग्नासाठी मुलगी मिळू नये या उद्देशाने तो हे करत होता त्यामागचे कारण धक्कादायक आणि हास्यास्पदही होते.

 • Arrested Fetal Gender Investigation Gangster reason of crime is shocking

  सीकर - राजस्थानातील या शहरात पोलिसांनी गर्भलिंगनिदान करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. टोळीचा म्होरक्या निर्मलबरोबर अटक केलेल्या सीतारामबाबात तर पोलिसांना अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याचे हे सर्व करण्यामागचे कारण बुचकाळ्यात टाकणारे आहे. भविष्यात कोणालाही लग्नासाठी मुलगी मिळू नये या उद्देशाने तो हे करत होता आणि त्यामागचे कारण धक्कादायक आणि हास्यास्पदही होती.


  दलाल सीतारामचे वय 30 वर्षांहून अधिक झाले होते. पण एवढे वय वाढल्यानंतरही त्याचे लग्न होत नव्हते. सीताराम मेडिकल स्टोर चालवत होता. पण लग्न होत नसल्याने तो नैराश्यात जात होता. अखेर त्याच्या नैराश्याचे रुपांतर प्रचंड रागात झाले. त्याने चौकशीत सांगितले की, त्याचे लग्न होत नव्हते म्हणून इतर कोणाचेही लग्न होऊ नये असे त्याला वाटत होते. त्या रागात त्याने असा संकल्प केला होता की, कोणालाही लग्नासाठी मुलगीच मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करेल. 20 वर्षांनंतर अविवाहित मुलांचा क्लब तयार करून सीतारामला त्या क्लबचा म्होरक्या व्हायचे होते. त्यासाठी तो गर्भवती महिलांना गर्भलिंगनिदान चाचणी करून देत होता.


  >> आरोपीने गेल्या 3 महिन्यात 22 गर्भवती महिलांची सोनोग्राफी टेस्ट करून घेतली होती.
  >> सीतारामकडे अवैध पोर्टेबल मशीन असल्याची माहितीही मिळाली आहे.
  >> टोळीचा म्होरक्या विदेशात मुलांच्या एमबीबीएसच्या शिक्षणाचा खर्च चालवतो.
  >> या प्रकरणात एका हॉस्पिटलची भूमिकाही संशयास्पद असल्याचे आढळून आले आहे.
  >> गर्भलिंगनिदान चाचणीसाठी 45 हजार रुपये घेत होते अशी माहितीही मिळाली आहे.

Trending