आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या अप्रतिम अभिनयाने रुपेरी पडद्यासोबतच छोटा पडदा गाजवल्यानंतर अर्शद वारसी आता वूट ओरिजिनल्सच्या 'असूरा' या वेब सीरिजमधून डिजिटल जगात पदार्पण करणार आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणा-या या सायकॉलॉजिकल थ्रीलरमध्ये अर्शद डॉ. धनंजय ही चलाख आणि काहीशी विचित्र अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे. पडद्यावर विनोदाचे उत्तम टायमिंग साधत या कलाकाराने आपले एक अढळ स्थान निर्माण केले. आता त्याला या वेगळ्या, नाट्यमय रुपात पाहताना त्याचे चाहते नक्कीच स्तिमित होतील.
वेब विश्वातील पदार्पणाविषयी अर्शद म्हणाला, "धनजंय ही व्यक्तिरेखा प्रौढ आहे. मात्र, समंजसपणा, हुशारी आणि अनुभवामुळे तो जे काही करतो ते उत्कृष्टच करतो. तो परफेक्शनिस्ट आहे." आपल्या व्यक्तिरेखेशी एकरूप होण्याची सर्व काळजी या अष्टपैलू अभिनेत्याने घेतली आहे. तो म्हणाला, "तयारी करताना कार्यक्रमाच्या दिग्दर्शकासोबत व्यक्तिरेखा समजून घेणे, हा मोठा भाग होता. त्यांच्यासोबत बराच काळ चर्चा केल्यानंतर प्रत्येक दृश्यातून, दिसणा-या फ्रेममधून त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, हे मला समजू शकले. या कार्यक्रमाची टीम भन्नाट आहे आणि 'असूरा'चा भाग असणे हे खरंच खूप छान आहे."
जगभरात ओटीटीची मागणी वाढत आहे. याबद्दल अर्शद म्हणाला, "भारतात ओटीटी व्यासपीठांचे भवितव्य उज्ज्वल आहे. डिजिटल जगात सर्जनशील पटकथांना, नव्या कथांना वाव आहे. त्यामुळे, या जगाचा भाग होणे ही मोठी संधी आहे. यातून अभिनेत्यांना आपल्या भूमिकांमध्ये प्रयोग करून पाहण्याची, आपली क्षितीजे विस्तारण्याची संधी मिळते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.