आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत मशीदीला आग! धमकीचे पत्रही सापडले, न्यूझीलंड दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका मशीदीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. न्यूझीलंडमध्ये दोन मशीदींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या काही दिवसांतच ही घटना घडली. विशेष म्हणजे, आग लागलेल्या मशीदीत कथितरित्या एक धमकीचे पत्र सापडले आहे. त्यामध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या मुस्लिमविरोधी दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे, या हल्ल्याचा न्यूझीलंड अथवा व्हाइट सुपरमॅसिस्ट वृत्तीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च येथे झालेल्या हल्ल्यात 50 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.


अमेरिकेतील पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार, मशीदीत आग लागल्याच्या घटनेत कुठल्याही स्वरुपाची जीवित हानी झाली नाही. इस्लामिक सेंटर ऑफ एस्कोंदिदोच्या सदस्यांनी अग्निशमन दलाचे बंब बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले. मीडिया रिपोर्टनुसार, मशीदीला लागलेली आग तीव्र स्वरुपाची नव्हती. तसेच प्राथमिक तपासात द्वेषभावनेतून ही आग लावण्यात आली असे सांगितले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी ख्रिस लिक यांनी सांगितल्याप्रमाणे, पार्किंगच्या ठिकाणी एक पत्र सापडले आहे. त्यामध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला. परंतु, त्या पत्रात नेमके काय-काय लिहिण्यात आले याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सोबतच, यामागे कुणाचा हात आहे याची माहिती देण्यास सुद्धा पोलिसांनी तूर्तास नकार दिला. ही घटना घडली त्यावेळी मशीदीत 7 जण होते. त्यांनी आग लागल्याचे पाहताच वेळीच अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले होते. यात कुणीही जखमी झालेला नाही.